सांगलीत एकाला लुटणाऱ्या 5 जणांना अटक
अल्पवयीन मुलाचाही समावेश : 92 हजारांचा मुद्देमाल जप्त, विश्रामबाग पोलिसांची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
शहरातील गोकुळनगर येथे मिरजेच्या तरुणाला लुटणाऱ्या 5 जणांना अटक करण्यात आली. एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून 92 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती विश्रामबागचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी दिली.
आदित्य रमेश भारती (वय २०, रा. तिवारी गल्ली खणभाग सांगली), रोहित रमेश देशपांडे (वय २४, रा. विठ्ठल कॉलनी शामरावनगर सांगली), इरफान जहागिर मुल्ला (वय २१, रा. जनता बैंक कॉलनी शामरावनगर सांगली), आर्यन चंद्रकांत नाईक (वय १९, रा. पाटणे गल्ली खणभाग सांगली), योगेश धनंजय शिंदे (वय २१, रा. लालगे गल्ली खणभाग सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दि. 25 मे रोजी रात्री अडीचच्या सुमारास गोकुळनगर येथे मिरजेतील सिद्धांत भुते या तरुणाला काहींनी लुटले होते. याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील संशयितांना पकडण्याच्या सूचना निरीक्षक भालेराव यांनी दिल्या होत्या.
त्यांचा शोध घेत असताना सहायक निरीक्षक चेतन माने, उपनिरीक्षक सुजाता भोपळे यांना काही तरुण मीरा हौसिंग सोसायटी येथील पडक्या जागेत थांबल्याची माहिती मिळाली. पथकाने तेथे जाऊन सर्व संशयितांना ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांना अटक करून 92 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
विश्रामबागचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक चेतन माने, उपनिरीक्षक सुजाता भोपळे, संदिप साळुंखे, अमर मोहीते, बिरोबा नरळे, चालक जावेद आत्तार, महमद मुलाणी, आर्यन देशिंगकर, प्रशांत माळी, गणेश बामणे, योगेश पाटील व चालक दत्ता कांबळे यांनी ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.