राज्यातील 75 दुय्यम निरीक्षकांच्या बदल्या
मुंबई : खरा पंचनामा
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडील 75 दुय्यम निरीक्षकांच्या बदल्या शुक्रवारी करण्यात आल्या आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागात बऱ्याच वर्षानंतर पारदर्शीपणे बदल्या झाल्याची चर्चा आहे. राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त डॉ. राजेंद्र देशमुख यांच्या सहीन बदल्यांचे हे आदेश काढण्यात आले आहेत. कार्यकाल पूर्ण झालेल्यांच्या न्याय्य पद्धतीने या बदल्या करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
बदली झालेले उपनिरीक्षक कंसात कोठून कोठे :
अजय वाघमारे (इस्लामपूर ते भरारी पथक कोल्हापूर), संतोष गोंदकर (भरारी पथक कोल्हापूर ते भरारी पथक मुंबई), शरद नरळे (कराड ते कर्जत), सतीश राजगुरू (नांदेड ते करवीर), रोहित केरीपाळे (नाशिक ते गडहिंग्लज), विशाल सरवटे (सिंधुदुर्ग ते सांगली), सचिन यादव (रत्नागिरी ते विराज अल्कोहोल, सांगली), राहुल मोरे (कुडाळ ते वाई), गिरीषकुमार कर्चे (कोल्हापूर ते भिवंडी), मयुरी पाटील (विराज अल्कोहोल ते इस्लामपूर), अजितकुमार नायकुडे (सांगली ते कागल).
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.