खुनाच्या गुन्ह्याचा 24 तासात छडा, मुंबईतून दोघांना अटक
उत्कृष्ट कामगिरीबद्दल मिरजेच्या महात्मा गांधी चौक पोलिसांचे अधीक्षकांकडून कौतुक
सांगली : खरा पंचनामा
मिरजेत झालेल्या खुनात कोणताही तांत्रिक पुरावा नसताना दोन संशयिताना कळंबोली, मुंबई येथून अटक करण्यात आली. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक निरीक्षक संदीप शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी शनिवारी झालेल्या गुन्हे आढावा बैठकीत कौतुक केले. शिवाय पथकाचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला.
दि. 19 एप्रिल रोजी रात्री नऊच्या सुमारास प्रकाश लंकाप्पा कांबळे (वय 45, रा. वाघमारे प्लॉट कोल्हापुर चाळ, मिरज) यांचा कोणीतरी कोणत्यातरी अज्ञात कारणाने डोक्यात दगड घालुन त्यांचा खुन केला होता. या घटनेत कोणताही परिस्थितीजन्य, प्रत्यक्षदर्शी, तांत्रिक पुरावा नसताना महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांनी तातडीने हालचाली करत 24 तासाच्या आत कळंबोली, मुंबई येथून स्वप्नील कांबळे रा. कोल्हापुर चाळ मिरज याला अटक करून गुन्हा उघडकीस आणला होता. 15 दिवसापुर्वी दारु पिण्याचे कारणावरुन झालेल्या वादाचे रागातुन त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली.
महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे कडील खुनाच्या गुन्हयातील अज्ञात ०२ आरोपी कोणताही तांत्रिक पुरावा नसताना निष्पन्न करून मुंबई येथून २४ तासांच्या आत अटक केल्याबद्दल पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक निरीक्षक संदीप शिंदे आणि त्यांच्या टीमला प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.