Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

जयंतराव, विश्वजीत, विशालशी मुख्यमंत्र्यांची वाढती जवळीक! सांगलीच्या कार्यक्रमात व्यासपीठावर दिसले अनोखे प्रेम

जयंतराव, विश्वजीत, विशालशी मुख्यमंत्र्यांची वाढती जवळीक! 
सांगलीच्या कार्यक्रमात व्यासपीठावर दिसले अनोखे प्रेम 

सांगली : खरा पंचनामा 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज शुक्रवारी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. पोलीस अधीक्षक कार्यालय उदघाटन कार्यक्रमात माजी मंत्री जयंतराव पाटील, माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम आणि जिल्ह्याचे विद्यमान खासदार विशाल पाटील यांची मुख्यमंत्र्यांशी वाढलेली जवळीक प्रकर्षाने दिसून आली. या सर्वांचा संवाद, अभिवादन, शेकहॅन्ड यातून त्यांच्यातील विशेष प्रेमही दिसून आले.  
कार्यक्रमाच्या आधीच निमंत्रित मान्यवरांचे आगमन झाले. व्यासपीठाच्या उजव्या बाजूला निमंत्रित मुख्यमंत्र्यांची वाट पहात सगळेच लोकप्रतिनिधी, मान्यवर थांबले होते. मुख्यमंत्री येताच आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे यांनी त्यांचे स्वागत केले. मुख्यमंत्री व्यासपीठावर येताच लोकप्रतिनिधीही तिकडे गेले. 
सुरुवातीला विश्वजित कदम व्यासपीठावर आले त्यांच्या पाठोपाठ खासदार विशाल पाटील, जयंतरावही आले. मुख्यमंत्र्यांनी शेकहॅन्ड करत त्यांचे अभिवादन स्वीकारले. त्यानंतर जयंतराव येताना पाहून मुख्यमंत्र्यांनी चार पावले पुढे येत जयंतरावांचे स्वागत करत हितगुज केले. त्यापाठोपाठ विशाल पाटील आले. त्यांच्याशीही हसत मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला.
हे होत असताना काही लोकप्रतिनिधी मुख्यमंत्र्यांच्या समोरून गेले पण त्यांनी तिकडे लक्ष दिले नाही. कार्यक्रम सुरु झाल्यावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील भाषणाला उभारले. त्यावेळी जयंतरावानी मुख्यमंत्र्यांशी हितगुज केले. त्यानंतर विश्वजित यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला काही निवेदने दिली. मुख्यमंत्री त्यांच्याशी दिलखुलास बोलताना दिसले. नंतर विशाल पाटील यांनीही निवेदने दिली. त्यांच्याशीही मुख्यमंत्री बराच वेळ बोलत असल्याचे दिसून आले.

मुख्यमंत्र्यांनी भाषणात जयंतरावांनी सांगितलेली पोलीस अधीक्षक कार्यालय इमारतीची माहिती दिली. यामधून एकप्रकारे जयंतरावांचे या इमारतीसाठी असणारे योगदान अप्रत्यक्षरित्या सांगितले.

व्यासपीठावर घडलेल्या या सर्व घडामोडीमुळे जिल्ह्यात वेगळ्या राजकीय चर्चा झडू लागल्या आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.