Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पोलीस कॉन्स्टेबल आणि पत्नीकडून एसटी चालकाला जबर मारहाण?

पोलीस कॉन्स्टेबल आणि पत्नीकडून एसटी चालकाला जबर मारहाण?

कोल्हापूर : खरा पंचनामा

कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर नावली, ता. पन्हाळा या ठिकाणी एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. किरकोळ कारणावरून मलकापूर आगाराच्या डेपोतील एसटी बस चालक नितीन शिरगांवकर यांना शहापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल असिफ महमंद कलायगार आणि त्यांच्या पत्नीने शिवीगाळ करत मारहाण केली.

एसटी बसला ओव्हरटेक करण्याच्या कारणावरून ही हाणामारी करण्यात आली. पोलिस कर्मचारी आपल्या पत्नी आणि परिवारासह बाहेर जात असताना हा प्रकार घडला आहे. सुरुवातीला किरकोळ वाद सुरु झाला. मात्र, पाहता पाहता हा वाद हाणामारीत बदलतो.

ही धक्कादायक घटना स्थानिकांनी मोबाईलमध्ये कैद केली असून, तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला असून अनेक माध्यमांवर शेअर करण्यात आलेला आहे.

ही घटना व्हायरल होताच नेटकरी वर्गात संतापाचे वातावरण पसरले आहे. व्हिडिओ पाहून एका यूजरने कमेंट केली, "लाल परी मधे आम्ही पण दिवस काढलेत ड्रायवरची चूक नसतांनाबी लोकं ड्रायव्हरला मारतात. नक्कीच त्या बाईचीच चूक असेल' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली, "गाडी बाई चालवत असणार" तर अनेक रागीट प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.