Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांच्या संपर्क कार्यालयास भेट

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांच्या संपर्क कार्यालयास भेट

सांगली : खरा पंचनामा

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे गुरुवारी सांगली जिल्ह्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी शिवसेना सांगली जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांच्या संपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली. तसेच भाजपा संघटन पर्वात सांगली जिल्ह्यातील नऊ मंडलांच्या अध्यक्षांची निवड प्रक्रिया नुकतीच संपन्न झाली. या सर्वांची भेट घेऊन त्यांनी शुभेच्छा दिल्या. 

चंद्रकांत पाटील यांनी सांगली दौऱ्यादरम्यान शिवसेना सांगली जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांच्या संपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी उपस्थित सर्व शिवसैनिकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी खा. धैर्यशील माने, आ. सत्यजीत देशमुख, भाजपा नेत्या निताताई केळकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

यासोबतच पाटील यांनी भाजपा संघटन पर्वात सांगली जिल्ह्यातील नऊ मंडलांच्या अध्यक्षांची निवड प्रक्रिया नुकतीच संपन्न झाली. यामध्ये सांगली पश्चिम - रवींद्र विजय वाढवणे, सांगली मध्य - राहुल लक्ष्मण नवलाई ,सांगली उत्तर अमित विजय देसाई, सांगली ग्रामीण - संतोष विठ्ठल सरगर, चैतन्य भोकरे मिरज पूर्व, सौ. अनिता हारगे मिरज पश्चिम, अभिजीत गौराजे मिरज ग्रामीण उत्तर, मयूर नाईकवाडे मिरज ग्रामीण दक्षिण, कुपवाड पूर्व - कृष्णा भीमराव राठोड यांची निवड झाली. या सर्वांचे पाटील यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.