Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

संतप्त सतेज पाटलांनी पोलिसांना धरलं धारेवरउदगाव येथे तीन तास चक्काजाम आंदोलनाने वाहतूक विस्कळीत

संतप्त सतेज पाटलांनी पोलिसांना धरलं धारेवर
उदगाव येथे तीन तास चक्काजाम आंदोलनाने वाहतूक विस्कळीत 

सांगली : खरा पंचनामा

अलमट्टी धरणाच्या उंचीवाडी विरोधात कोल्हापूरच्या उदगाव टोल नाका या ठिकाणी सर्व पक्ष चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. मात्र आंदोलनाच्या ठिकाणी येणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून अडवण्यात येत असल्याचा प्रकार करण्यात येत असल्याने संतप्त झालेल्या माजी मंत्री सतेज पाटलांनी थेट व्यासपीठावरून उतरत कार्यकर्त्यांना आडवण्याच्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत पोलीस अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा घातलेला घाट जीव गेला तरी पूर्ण होऊ देणार नाही. वडेनरे समितीने दिलेल्या अहवाल चुकीचा असून हा रिपोर्ट रद्द करा. पश्चिम महाराष्ट्राला या महापराच्या विळख्यातून बाजूला काढा. यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांनी एकत्रितपणे अलमट्टीच्या उंची  वाढीचा निर्णय हाणून पाडा अशी एकजूट मागणी सर्वपक्षीयांनी केली.

उदगाव (ता. शिरोळ) येथील सांगली कोल्हापूर महामार्गावर सर्वपक्षीयांच्या वतीने अलमट्टी उंची वाढीच्या विरोधात रविवारी सकाळी दहा वाजता चक्का आंदोलन करण्यात आले. तब्बल ३ तासानंतर पाटबंधारे विभागाने बुधवार दि  21 रोजी मुंबई येथे मंत्रालयात पाटबंधारे मंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली याबाबत बैठक घेणार असल्याचे पत्र दिल्यानंतर हा चक्काजाम आंदोलन मागे घेण्यात आला.

उदगाव येथील टोल नाक्यावर सर्वपक्षीयांनी चक्काजाम आंदोलन केल्याने सांगली कोल्हापूर महामार्गावरील सर्व वाहतूक पर्यायी मार्गाने सोडल्याने विस्कळीत झाली होती. अनेकांना मोठा त्रास सहन करावा लागला. 

अलमट्टी उंचीला सर्वांचा विरोध असून सरकारने यावर कठोर निर्णय घेतला नाही तर लवकरच कोगनोळी तालुका निपाणी येथील पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग रोखून सरकारला शेतकऱ्यांची व पूरग्रस्तांची ताकद दाखवू असाही निर्णय घेण्यात आला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.