'गोपीचंद पडळकर यांच्या मिरवणुकीत झळकले लॉरेन्स बिश्नोईचे फलक'
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतापले
पुणे : खरा पंचनामा
भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नाशिकमधील मिरवणुकीत कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे फलक झळकविण्यात आले होते. या प्रकराची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे.
पुण्यात माध्यमांशी बोलत असताना याबाबतचा प्रश्न फडणवीस यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, "आमदार गोपीचंद पडळकर यांच्याशी याबाबत बोलणे झाले असून पडळकर यांनी पोलिसांना याबाबतची माहिती द्यावी, असे सांगितले आहे. या प्रकारावर कठोर कारवाई करण्यास सांगितले आहे. लॉरेन्स बिश्नोई सारख्या गुंडाचे उदात्तीकरण सहन केले जाणार नाही. ज्यांनी फलक झळकवले त्यांच्यावर कारवाई होईलच."
स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आलेल्या मुदतीबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, निवडणूक आयोगाने निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे. आम्ही वेळेत या निवडणुका घेण्याचा प्रयत्न करू. ज्या भागात पावसाचा जोर असेल त्या भागात निवडणूक काही दिवसांसाठी पुढे ढकलण्याची विनंती करू. याबाबत सरकार आणि निवडणूक आयोग योग्य तो समन्वय राखेल. पण वेळेत निवडणुका पूर्ण झाल्याच पाहिजेत, असा आमचा प्रयत्न आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.