पोलिसाचा शिक्षिकेवर अत्याचार
प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी
नाशिक : खरा पंचनामा
गेल्या काही दिवसांपासून राज्यात खून, अत्याचार, हाणामारी अशा गुन्हेगारीच्या घटना वारंवार घडत आहेत. अशातच आता नाशिक शहरातील इंदिरानगर परिसरात एका पोलिसाने शिक्षिकेवर अत्याचार केला असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अभी उर्फ चंद्रकांत दळवी असं अटक झालेल्या पोलिसाचं नाव आहे. तो ज्या पोलीस ठाण्यात कार्यरत होता, त्याच पोलीस ठाण्यातील पोलिसांकडून त्याला अटक करण्यात आली आहे. यामुळे परिसरात चर्चांना उधाण आलं आहे.
मागील काही वर्षापासून आरोपी चंद्रकांत दळवी आणि शिक्षिका यांच्यात प्रेमसंबंध होते. विवाहित पीडित शिक्षिकेची २०२० मध्ये आरोपी दळवीशी ओळख झाली होती. कालांतराने या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. पीडित शिक्षिकेनं घरच्यांपासून लपून दळवीशी विवाह केला. पण त्यानंतर दोघांमध्ये किरकोळ कारणातून वाद होऊ लागले. या वादातुन आरोपींने शिक्षिकेला प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.
दरम्यान आरोपीच्या या धमकीनंतर पीडितेनं पोलीस ठाण्यात धाव घेतली. यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.