अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
नवी दिल्ली : खरा पंचनामा
पंजाब पोलिसांनी पाकिस्तानी ISI निगडीत २ गुप्तहेरांना अटक केली आहे. पलाक शेर मसीह आणि सूरज मसीह असं अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. भारतीय सैन्याची गोपनीय माहिती पाकिस्तानला पाठवल्याचा आरोप दोघांवर आहे.
दोन्ही आरोपींनी भारतीय सैन्याची छावणी, एअरबेस आणि अन्य संवेदनशील क्षेत्राचे फोटो, माहिती शत्रू देशाला दिल्याचं तपासात उघड झाले आहे. ही सर्व माहिती जेलमध्ये बंद गँगस्टर हरप्रीत सिंग उर्फ पिट्टूच्या हॅप्पी नेटवर्कच्या माध्यमातून ISI पाठवली जात होती.
पंजाब पोलिसांनुसार, अटकेतील आरोपींचं गुप्तहेर नेटवर्क असू शकते, जे सोशल मीडियावर बनावट कागदपत्राच्या आधारे सैन्य ठिकाणांवर पोहचून तिथली गोपनीय माहिती गोळा करत होते. या प्रकरणी Official Secrets Act अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस महासंचालक गौरव यादव यांनी या दोघांच्या अटकेची बातमी पोस्ट केली आहे. पंजाब पोलिस देशाच्या सुरक्षेशी तडजोड करणाऱ्या कुठल्याही किंमतीत सोडणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे. ही निर्णायक कारवाई असून येणाऱ्या काळात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.
या दोन आरोपींनी पाकिस्तानला काय काय माहिती दिली, त्यामागे त्यांचा हेतू काय होता या सर्व प्रकाराची चौकशी पोलीस करत आहेत. त्याशिवाय या गुप्तहेरांचे नेटवर्क शोधण्याचं काम पोलीस करत आहे. पलक शेर मसीह आणि सूरज मसीह यांच्याकडे अमृतसर येथील वायू सेनेच्या ठिकाणांची संवेदनशील माहिती आणि फोटो मिळाले आहेत. प्राथमिक तपासात या दोघांचा संबंध पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ISI शी असल्याचं उघड झाले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.