Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राज्यातील ३ उपायुक्त, ८ अधीक्षक, २ उपअधीक्षक, २६ निरीक्षकांच्या बदल्या दुय्यम निरीक्षकांच्या बदलीतही पारदर्शीपणा राहणार?

राज्यातील ३ उपायुक्त, ८ अधीक्षक, २ उपअधीक्षक, २६ निरीक्षकांच्या बदल्या 
दुय्यम निरीक्षकांच्या बदलीतही पारदर्शीपणा राहणार?

मुंबई : खरा पंचनामा

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडील तीन उपायुक्त, ८ अधीक्षक, २ उपअधीक्षक आणि २६ निरीक्षकांच्या बदल्या शुक्रवारी करण्यात आल्या आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागात बऱ्याच वर्षानंतर पारदर्शीपणे बदल्या झाल्याची चर्चा आहे. राज्य शासनाचे उप सचिव रविंद्र औटे यांच्या सहीन बदल्यांचे हे आदेश काढण्यात आले आहेत. दरम्यान या बदल्यांप्रमाणेच या विभागातील दुय्यम निरीक्षकांच्या बदल्याही पारदर्शीपणे होणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कार्यकाल पूर्ण झालेल्यांच्या न्याय्य पद्धतीने या बदल्या करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

बदली झालेल्या उपायुक्तांची नावे कंसात कोठून कोठे : 
सुभाष बोडके : उपायुक्त (निरीक्षण) ते उपायुक्त (औषधे व सौंदर्यप्रसाधने), शंकर जगताप ०: उपायुक्त (मळी व मद्यार्क) ते उपायुक्त (प्रशासन), अनुप पुराणिक : उपायुक्त (प्रशासन) ते उपायुक्त - (मळी व मद्यार्क).

बदली झालेल्या अधीक्षकांची नावे कंसात कोठून कोठे : 
सुधाकर कदम (पालघर ते नांदेड), शशिकांत गर्जे (नाशिक ते अमरावती), संतोष झगडे (छत्रपती संभाजीनगर ते नाशिक), ज्ञानेश्वरी आहेर (अमरावती ते जालना), गणेश बारगजे (धाराशिव ते पालघर), अभिनव बालुरे (वाशीम ते छत्रपती संभाजीनगर), अतुल कानडे (नांदेड ते पुणे), संजय पाटील (नियुक्तीच्या प्रतीक्षेत ते वर्धा).

बदली झालेले उपअधीक्षक कंसात कोठून कोठे :
बाबासाहेब भूतकर (पालघर ते रायगड), ऋषिकेश इंगळे (सांगली ते पालघर).

बदली झालेले निरीक्षक कंसात कोठून कोठे :
प्रशांत रासकर (इस्लामपूर ते कर्जत), राहुल गुरव (छत्रपती संभाजीनगर ते विटा, सांगत खरात (सातारा ते कागल तपासणी नाका, कोल्हापूर), तानाजी कदम (धाराशिव ते इस्ल सांगली), विजय मनाले (विटा सांगली ते उदगीर, लातूर).

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.