विद्या प्रबोधिनीतील बिरदेव डोणे, दिलीपकुमार देसाई आणि हेमराज पाणोरेकर यांचा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून सन्मान
कोल्हापूर : खरा पंचनामा
एमपीएससी आणि यूपीएससी हे असंख्य विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. या परीक्षासाठी विद्यार्थी दिवसरात्र मेहनत घेत असतात. त्यांच्या या मेहनतीला बळ देण्यासाठी कोल्हापूरमध्ये विद्या प्रबोधिनी सातत्याने प्रयत्न करते. यंदा विद्या प्रबोधिनीतील बिरदेव डोणे, दिलीपकुमार देसाई आणि हेमराज पाणोरेकर यांनी यूपीएससीमध्ये यश मिळवले. आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांचा सन्मान करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यशवंत विद्यार्थ्यांनी भावी कारकीर्दीत सामाजिक बांधिलकी जपावी, अशी भावना यावेळी पाटील यांनी व्यक्त केली. पाटील यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देखील केले. विद्या प्रबोधिनीचे राजकुमार पाटील यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते.
बिरदेव सिध्दाप्पा डोणे, याचे वडील मेंढपाळ, घरात कोणतीही सुविधा नाही, शिक्षणाचं वातावरण तर दूरची गोष्ट. या परिस्थितीतही UPSC च्या निकालाने नशिब पालटले. UPSC निकाल आला तेव्हा बिरदेव सिध्दाप्पा डोणे हा मेंढ्या चारत होता. त्याला देशात 551 वी रँक मिळाली आहे. जांभूळवाडीचा दिलीपकुमार देसाई याचा ६०५ क्रमांक आला. देशभरातून यांचे कौतुक करण्यात येत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.