Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"जय पवारला कोणत्या अवस्थेत घरी सोडलं, याचा पुरावा आहे"

"जय पवारला कोणत्या अवस्थेत घरी सोडलं, याचा पुरावा आहे" 

बीड : खरा पंचनामा 

संतोष देशमुख खून प्रकरणातला मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्या एन्काऊंटरची आपल्याला ऑफर होती, असा दावा करुन रणजित कासलेंनी खळबळ उडवून दिली होती. एवढंच नाहीतर मतदानाच्या दिवशी आपल्या खात्यावर १० लाख रुपये पाठवण्यात आलेले होते, ईव्हीएम मशिनमध्ये छेडछाड करण्यासाठी हे पैसे दिले होते, असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडेंना टार्गेट केलं होतं.

रणजित कासलेंचं निलंबन झाल्यानंतर त्यांनी पोलिसांवरही गंभीर आरोप केले होते. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. ते सरेंडर झाले होते, आता जामिनावर बाहेर आलेले आहेत. पोलिस खात्यातून त्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. त्यामुळे ते आणखी नवनवे आरोप करीत आहेत.

यातच त्यांनी रविवारी अजित पवार आणि त्यांचे पुत्र जय पवार यांच्या संबंधाने आरोप केला आहे. ते म्हणाले की, एक-एक करुन अजितदादा माझ्या मागे लागले आहेत. परंतु मीही मरिन ड्राईव्हला काम केलं आहे. काही पत्ते मीसुद्धा माझ्याकडे ठेवलेले आहेत.

"जय पवारला कुठल्या अवस्थेत घरी सोडलं होतं, हे मला माहिती आहे. त्याची स्टेशन डायरी माझ्याकडे प्रिंटमध्ये आहे, फोटोकॉपी आहे. गरज लागली तर बाहेर काढीन. एक एक पत्ता बाहेर काढणार आहे. सगळंच एकदा बाहेर काढणार नाही." असं म्हणत कासलेंनी थेट अजित पवारांवर निशाणा साधला.

रणजित कासले पुढे म्हणाले, जेलमध्ये काय चालतं, काय नाही.. हे मी सातत्याने सांगणार आहे. वाल्मिक कराडला आतमध्ये व्हिआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचं मी बघितलं आहे. मी आत गेलो तेव्हा तो कुठं आहे, त्याची माहिती घेतली होती. त्याला संध्याकाळी स्पेशल कपमध्ये चहा आला. त्याला तीन लेअरच्या स्पेशल चपात्या येत होत्या. एवढंच नाहीतर तो जेलच्या कँटिनमधून २५ हजारांचं सामान घेतो, याची चौकशी झाली पाहिजे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.