Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच'दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक

'सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच'
दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक

ठाणे : खरा पंचनामा

पूर्वी लाच ही थेट मागितली जायची किंवा कुणा मध्यस्थीद्वारे स्वीकारली जायची. पण आता आधुनिक काळात लाच मागण्याची पद्धतही बदलली असल्याचे ठाण्यातील मोबाइल डेटा चोरी प्रकरणातून उघड झाले आहे.

पोलिसाने थेट क्यूआर कोड स्कॅन करून पैसे मागितल्याने 'मी सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच' अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

मोबाइल फोन क्रमांकाचा डेटा चोरून विकला जात असल्याची माहिती एटीएसला समजली आणि या प्रकरणाला वाचा फुटली. तब्बल दोन वर्षांहून अधिक काळ हा प्रकार सुरू होता. या प्रकरणात दोन पोलिसांसह पोलिस खबऱ्या अशा तिघांना अटक केली. त्या तिघांनाही न्यायालयाने १५ मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. एका पोलिसाने, तर व्यवहाराचे पैसे घेण्यासाठी चक्क क्यूआर कोडचा वापर केला. एवढेच नाहीतर कुटुंबातील काही जणांच्या खात्यावर या व्यवहाराचे पैसे घेतल्याचे तपासात पुढे आले.

५ मे रोजी ठाणे शहर पोलिस आयुक्तालयातील सायबर पोलिस ठाण्यात मोबाइलमधील डेटा चोरी करून विकल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी आकाश सुर्वे आणि हर्षद परब या दोन पोलिसांसह मोहम्मद सोहेल मोहम्मद शब्बीर राजपूत या खबऱ्याला अटक केली.

गुन्हे शाखेने त्या तिघांचे मोबाइल जप्त केले असून, खबऱ्याची गाडीही ताब्यात घेतली. तर, मोबाइल तपासणीपूर्वी खबऱ्या दोघांना माहिती काढण्यास सांगायचा. त्या बदल्यात तो ठरल्याप्रमाणे पैसे देत होता, तर मोबाइलच्या तपासणीत एका पोलिस शिपायाने क्यूआर कोडचा वापर करून पैसे घेतल्याचे समोर आले.

अटकेत असलेला मोहम्मद सोहेल मोहम्मद याच्याकडे पीएसआय पोलिस अधिकाऱ्याचा ड्रेस, पोलिस काठी, वायरलेस, पोलिस कॅप, गाडीवर पोलिसांचे स्टिकर आदी वस्तू आढळल्या. याशिवाय तो लॉजवर राहताना पोलिस असल्याची बतावणी करून राहत असल्याचेही तपासात समोर आले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.