कोल्हापूरच्या पोलीस कॉन्स्टेबलने वैभववाडीत घेतला गळफास
वैभववाडी : खरा पंचनामा
वैभववाडी बाजारारपेठीतील गुरव कॉम्प्लेक्स येथे राहात असलेले पोलीस कॉन्स्टेबल अनिल गोविंद शेटे (वय 40) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली असून गुरव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
कॉन्स्टेबल अनिल शेटे हे मुळ कोल्हापूरातील पन्हाळा तालुक्यातील कडोली या गावचे आहेत. मात्र, गेली काही वर्षे वैभववाडी पोलीस ठाणे येथे कार्यरत होते. सहा महिन्यांपूर्वी त्यांची विजयदुर्ग पोलीस ठाणेत बदली झाली होती. मात्र त्यांची मानसिक स्थिती ठीक नसल्यामुळे त्यांच्यावर मानसिक आजाराचे उपचार सुरू होते. दोन दिवसांपूर्वीच ते उपचारासाठी कोल्हापूरला जाऊन आले होते. गुरुवारी रात्री पत्नी किचनमध्ये जेवण बनवत होती. तर, अनिल हे बेडरूममध्ये होते. बराचवेळ ते बेडरूम मधून बाहेर आले नाहीत. म्हणून पत्नीने हाक मारली. हाक मारूनही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पत्नीने खिडकीतून डोकावून पाहिले असता, ते फॅनला लटकलेल्या अवस्थेत दिसले. त्यांनी आरडा ओरड केल्यानंतर शेजारचे ग्रामस्थ धावत आले, तसेच याची माहिती पोलीसांना कळवण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेत दरवाजा तोडून त्यांना खाली उतरून घेऊन ग्रामीण रुग्णालय वैभववाडी येथे नेले. त्याठिकाणी उपचारपूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. यापूर्वी सुद्धा त्यांनी दोन तीन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या पश्चात आई-वडील पत्नी दोन मुली असा परिवार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.