Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आषाढी वारीत सहभागी 'या' वाहनांना टोलमाफीएकनाथ शिंदेंकडून महत्त्वाची माहिती

आषाढी वारीत सहभागी 'या' वाहनांना टोलमाफी
एकनाथ शिंदेंकडून महत्त्वाची माहिती

मुंबई : खरा पंचनामा

आषाढी वारी २०२५ पारंपरिक भक्तिभाव, सांस्कृतिक समृद्धी आणि लाखो वारकऱ्यांच्या सहभागाने पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकऱ्यांसाठी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. वारी मार्गावरील वाहनांना टोल माफी, वैद्यकीय सेवा, विमा संरक्षण, तसेच रस्त्यांच्या डागडुजीसह अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

वारीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक वारकऱ्यासाठी यंदाही शासनाकडून समूह विमा योजना लागू केली जाणार आहे. वारी दरम्यान उद्भवणाऱ्या आकस्मिक घटनांमध्ये वारकऱ्यांना आर्थिक मदतीचा आधार मिळावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

गतवर्षीप्रमाणे यंदाही वारी दरम्यान मोफत आरोग्य तपासणी शिबिरे, कार्डियाक रुग्णवाहिका, आणि तात्पुरती आयसीयू सुविधा पंढरपुरात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यातून निघणाऱ्या मोठ्या दिंड्यांसोबत सुसज्ज रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. आरोग्य मंत्री प्रकाश आंबिटकर यांना स्वतः पंढरपूरला जाऊन सर्व व्यवस्था तपासण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.

मुसळधार पावसामुळे खराब झालेल्या वारी मार्गांची तातडीने डागडुजी, मुरूम, खडी आणि डांबरीकरणाच्या कामांसाठी यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश दिले गेले आहेत. तसेच, पाणीपुरवठा, वीजजोडणी, आणि पालखी तळांवर वॉटरप्रूफ तंबूंची सोय करून वारकऱ्यांना कोणतीही अडचण भासणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. वारी मार्गावर पालखी आणि सेवेसाठी चालणाऱ्या वाहनांना टोल माफी दिली जाणार आहे. ही सवलत दरवर्षीप्रमाणे यंदाही लागू होणार असून, याचा लाभ लाखो वारकऱ्यांना मिळणार आहे.

वारीदरम्यान पोलिस आणि प्रशासनामधील समन्वय सुलभव्हावा यासाठी नोडल अधिकारी नेमण्यात येणार आहेत. तसेच, भोजन, विसावा, धार्मिक प्रथा वेळच्या वेळी पार पडाव्यात यासाठी सर्व यंत्रणा सक्रिय राहतील. कुठेही वारी अडथळ्यात येणार नाही, याची विशेष काळजी घेतली जाणार आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.