Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

ट्रेनिंगदरम्यान प्रशिक्षणार्थी पोलिसाचा मृत्यू; धक्कादायक कारण समोर

ट्रेनिंगदरम्यान प्रशिक्षणार्थी पोलिसाचा मृत्यू; धक्कादायक कारण समोर

धुळे : खरा पंचनामा

धुळ्यात एका प्रशिक्षणार्थी पोलीस जवानाचा प्रशिक्षण केंद्रात मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. प्रशिक्षण सुरु असताना अचानक या जवानाच्या छातीत दुखू लागले, त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्याला पनिशमेंट ट्रेनिंग दिल्याने हा सर्व प्रकार घडला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पंकज यशवंत घायवट (वय ४३ वर्ष) असे मृत्यू झालेल्या पोलीस प्रशिक्षणार्थीचे नाव आहे. पंकज घायवट हा एक्स मॅन होता अशी माहिती समोर आली आहे. पनिशमेंट ट्रेनिंगमुळे त्याचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. यामुळे पंकज सोबत असलेल्या पोलीस प्रशिक्षणार्थी जवानांनी एकच आक्रोश केला आहे.

सोबतच्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी काही बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांना संबंधित अधिकाऱ्यांतर्फे मज्जाव करण्यात येत आहे. ही धक्कादायक घटना संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे झाला आहे का असा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणामुळे धुळ्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्रात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

धुळ्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्रात एका प्रशिक्षणार्थी पोलीस जवानाचा दुर्दैवी मृत्यू झाला. छातीत दुखू लागल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. या जवानाला हृदयविकाराचा झटका आल्याचे म्हटले जात आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.