"असं काम माझ्यासोबत बिल्कुल चालणार नाही"
परळी : खरा पंचनामा
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार सोमवारी बीड जिल्हा दौऱ्यासाठी दाखल झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीडचे पालकमंत्री झाल्यानंतर आज (19 मे) प्रथमच परळीच्या दौऱ्यावर आहेत. परळीतूनच त्यांनी या दौऱ्याची सुरुवात केली.
परळीतील विविध विकास कामे आणि महत्वपूर्ण बैठका आणि बीड जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. अजित पवार यांनी वैद्यनाथाचे दर्शन घेऊन पुढील कार्यक्रमांना हजेरी लावली. यावेळी मंत्री पंकजा मुंडे आणि परळीचे आमदार धनंजय मुंडे हे देखील उपस्थित होते.
दरम्यान, अजित पवार यांनी विकास कामाची पाहणी केली असता त्यांनी एका कंत्राटदाराला धारेवर धरत खडे बोल सुनावले. बैद्यनाथ मंदिरांच्या पूर्वेला असणाऱ्या द्वारासमोरील पायऱ्याचे काम सुरू आहे. काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला अजित पवारांनी पायऱ्याच्या कामाच्या दर्जावरून सुनावले आहे.
अजित पवार परळीमध्ये आले असता ते तिथं बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असणाऱ्या परळी वैद्यनाथ क्षेत्राच्या विकास आराखड्यासाठी बैठक घेणार होते. याचसाठी ते मंदिरापाशी पोहोचले आणि तिथं पायऱ्या चढून जाताना तिथलं काम व्यवस्थित नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि लगेचच त्यांनी कंत्राटदाराला फैलावर घेतलं.
असं काम माझ्यासोबत बिल्कुल चालणार नाही अशी तंबी त्यांनी कंत्राटदाराला दिली. आपण पुढच्या वेळी जेव्हा येथे येऊ तेव्हा असं काम दिसायला नको अन्यथा यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराच अजित पवार यांनी दिला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.