Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

गोवा बनावटीची पावणेसात लाखांची दारू जप्त, सांगलीतील दोघांना अटकबनावट लेबल्स बनवणाऱ्यांचाही पर्दाफाश

गोवा बनावटीची पावणेसात लाखांची दारू जप्त, सांगलीतील दोघांना अटक
बनावट लेबल्स बनवणाऱ्यांचाही पर्दाफाश

कोल्हापूर : खरा पंचनामा

गोव्याहून दारूची तस्करी करणाऱ्या दोघांना राज्य उत्पादन शुल्क पथकाने अटक केली. गडहिंग्लज चंदगड राज्यमार्गावरील शिप्पूर तर्फ नेसरी (ता. गडहिंग्लज) येथे केलेल्या या कारवाईत वाहनासह साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, गोवा दारूच्या बाटलीवर हुबेहूब महाराष्ट्रातील स्पिरीट कंपनीचे लेबल लावणाऱ्या टोळीचाही पथकाने पर्दाफाश केला.

याप्रकरणी प्रकाश बळीराम चव्हाण (रा. कोणीकोणूर, ता. जत, जि. सांगली) व अनिल विकास सोलनकर (रा. माडग्याळ, ता. जत) व बनावट लेबलप्रकरणी संकेत संजय मुळावकर (रा. जोडभावी पेठ, ता. जि. सोलापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

मिळालेल्या बातमीनुसार, उत्पादन शुल्कच्या पथकाने शिप्पूर तर्फ नेसरीजवळ सापळा लावून वाहनांची तपासणी सुरू केली. चंदगडहून गडहिंग्लजकडे येणाऱ्या वाहनाची (एमएच १०, डीव्ही ९८७०) तपासणी केली असता त्यात गोवा बनावटीच्या दारूचे १६ बॉक्स आढळले. वाहनातील दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी मिळाली.

या प्रकरणाच्या तपासासाठी प्रकाशच्या कोणीकोनूर येथील हॉटेलमध्ये छापा टाकला. तेथे गोवा बनावटीच्या ३२ सीलबंद दारूच्या बाटल्या सापडल्या. या गुन्ह्यात एकूण सहा लाख ८६ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पथकाला विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर, जिल्हा अधीक्षक श्रीमती स्नेहलता नरवणे, उपाधीक्षक युवराज शिंदे यांचे मार्गदर्शन मिळाले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.