दारूची तस्करी करणारा घोडा नजरकैदेत!
चंपारण : खरा पंचनामा
दारूची तस्करी केल्याचा गंभीर आरोप करत एका घोडय़ाला चक्क पोलिसांनी नजरकैदेत ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना बिहार राज्यातील चंपारण जिल्ह्यात घडली आहे. या घोडयावर पोलिसांनी देशी दारूची चोरट्या मार्गाने तस्करी केल्याचा आरोप ठेवला आहे.
बिहारमध्ये काही तस्कर अमली पदार्थांच्या तस्करीसाठी घोडय़ाचा वापर करत आहेत, परंतु चंपारण पोलिसांनी घोडय़ाच्या मालकाविरोधात कारवाई करण्याऐवजी घोडय़ाला नजरकैदेत ठेवले आहे. गंडक नदीकाठावर एक घोडा रोखण्यात आला. त्याच्यावर लादलेला माल संशयास्पद वाटल्याने त्याची तपासणी केली असता, त्याच्यावर लादलेल्या सामानात मद्याचे फुगे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी या घोडय़ास दारूसह ताब्यात घेतले. मात्र घोडयाचा मालक असलेला तस्कर अंधाराच्या आडून पळून जाण्यात यशस्वी झाला. हा माल उत्तर प्रदेशातून आणण्यात आला होता, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी जप्त केलेला घोडा स्थानिक रहिवाशाच्या देखरेखीखाली ठेवण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयात आणल्यानंतर त्याच्या देखभालीचा खर्च आरोपीकडून वसूल केला जाईल. जर आरोपीने दंड भरला नाही तर घोडय़ाचा लिलाव केला जाऊ शकतो.
देशी आणि विदेशी दारूची तस्करी करण्यासाठी तस्करांनी आता वेगळा मार्ग अवलंबिला आहे. सुरुवातीला नदीकाठच्या पट्टय़ांमधून दारू वाहतूक करण्यासाठी बोटींचा वापर केला जात होता, परंतु नदीतील गस्त वाढल्यामुळे त्यांना नवीन रणनीती अवलंबण्यास भाग पाडले गेले. आता घोडय़ांसारख्या प्राण्यांचा वापर राज्याच्या सीमा ओलांडून गुप्तपणे दारू वाहतूक करण्यासाठी केला जात आहे. या प्रकरणी आरोपीची ओळख पटली असून आकाश यादव याला तस्करीच्या प्रयत्नासाठी जबाबदार धरले आहे. आरोपी फरार असल्याने घोडय़ाला पोलीस स्टेशनमध्ये आणले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.