Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'गुजरात समाचार'च्या कार्यालयावर छापे, 'ईडी'कडून बाहुबली शाह यांना अटक

'गुजरात समाचार'च्या कार्यालयावर छापे, 'ईडी'कडून बाहुबली शाह यांना अटक

अहमदाबाद : खरा पंचनामा

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरुवारी गुजरातमधील सर्वात मोठे वृत्तपत्र असलेल्या गुजरात समाचार दैनिकाचे सह-मालक बाहुबली शाह यांना अटक केली. बुधवारी आयकर विभागाने त्यांच्या दैनिकाच्या कार्यालयावर आणि त्यांच्या मालकीच्या निवासस्थानी छापे टाकले होते. त्यानंतर गुरुवारी उशिरा ईडीने शाह यांना अटक केली. त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी व्हीएस रुग्णालयात नेण्यात आले आहे. दरम्यान, शाह यांनी त्यांना खासगी रुग्णालयात नेण्याचा आग्रह धरला. त्यानंतर त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी झायडस रुग्णालयात नेण्यात आले.

गुजरात समाचार हे गुजरातमधील आघाडीचे स्थानिक वृत्तपत्र म्हणून ओळखले जाते. दरम्यान, ईडीच्या कारवाईवर त्यांचे भाऊ श्रेयांस शाह यांनी म्हटले आहे की 'आम्ही लढत राहू'.

बुधवारी, मुंबईहून आलेल्या आयकर विभागाच्या पथकाने गुजरात समाचारच्या खानपूर येथील मुख्य कार्यालयावर तसेच बाहुबली शाह, श्रेयांस शाह यांच्या निवासस्थानांवर आणि एस जी महामार्गावरील जीएसटीव्ही चॅनेलवर छापे टाकले होते. आयकर विभागाची ही कारवाई संपल्यानंतर, सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी गुजरात समाचारच्या कार्यालयांची आणि मालकांच्या निवासस्थानी झाडाझडती घेतली. सूत्रांनी सांगितले की, ही कारवाई आर्थिक अनियमिततेशी संबंधित प्रकरणाशी होती.

या आठवड्याच्या सुरुवातीला, आयकर विभागाने अहमदाबाद आणि आजूबाजूच्या भागात ३० ठिकाणी छापेमारी केली होती. प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक, गुंतवणूकदार, सरकारी कंत्राटदार आणि शेअर बाजार ब्रोकर यांच्यावर ही कारवाई केली होती. या कारवाईसाठी मुंबईहून अधिकाऱ्यांचे एक विशेष पथक अहमदाबादला गेले होते. सुरत, वडोदरा, राजकोट आणि अहमदाबाद येथील अधिकाऱ्यांचा यात सहभाग होता. यात सुमारे ४०० सदस्य होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.