Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

बीडमध्ये पालकमंत्र्यांचा मान धनंजय मुंडेंना

बीडमध्ये पालकमंत्र्यांचा मान धनंजय मुंडेंना

बीड : खरा पंचनामा 

बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिपदाचा राजीनामा दिलेले धनंजय मुंडे हे काही काळाच्या सार्वजनिक अनुपस्थितीनंतर आज महाराष्ट्र दिनी परळीतील ध्वजवंदन सोहळ्याला उपस्थित राहिले. दुसरीकडे, जालना येथे मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.

संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते आणि राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या प्रकरणी मुख्य आरोपी वाल्मिक कराडसह सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेनंतर, प्रकरणाचे दोषारोपपत्र दाखल झाल्यावर आणि मारहाणीचे काही धक्कादायक फोटो समोर आल्यानंतर, अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.

राजीनाम्यासाठी त्यांनी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण दिले होते. तेव्हापासून ते कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसले नव्हते. मात्र, अनेक दिवसांच्या विरामानंतर, आज १ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ते परळी तहसील कार्यालयात आयोजित शासकीय ध्वजवंदन कार्यक्रमाला उपस्थित राहिले, ज्यामुळे त्यांच्या पुनरागमनाची चर्चा सुरू झाली आहे.

आज सकाळी परळी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात माजी मंत्री आणि विद्यमान आमदार धनंजय मुंडे यांच्या हस्ते ठीक ८ वाजून ५ मिनिटांनी ध्वजवंदन करण्यात आले. या शासकीय कार्यक्रमाला तहसील कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी, विविध विभागांचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. धनंजय मुंडे यांची प्रकृती अस्वस्थ असल्याने ते काही काळ सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर होते, त्यामुळे त्यांची आजची उपस्थिती विशेष ठरली.

त्याचबरोबर, जालना येथे जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी पोलीस कवायत मैदानावर आयोजित महाराष्ट्र दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात ध्वजवंदन केले. या सोहळ्याला खासदार डॉ. कल्याण काळे आणि आमदार अर्जुन खोतकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि पोलीस महासंचालक पदक प्राप्त पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मानही केला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.