Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या पतीला पोलिसांकडून अटक

महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या पतीला पोलिसांकडून अटक

मुंबई : खरा पंचनामा

सरकारी कोट्यातून स्वस्तात घर देण्याचे आमिष दाखवून शीव येथील व्यावासायिकासह इतरांची २४ कोटी ७८ लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली आर्थिक गुन्हे शाखेने पुरुषोत्ताम चव्हाण याला अटक केली.

मुख्य आरोपी चव्हाण हे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचे पती आहेत. याप्रकरणी चव्हाण यांच्यासह ११ जणांविरोधात गुन्हा दाखल आहे. सक्तवसुली संचलनालय (ईडी) तपास करीत असलेल्या २६३ कोटींच्या प्राप्तिकर गैरव्यवहाराप्रकरणाच्या तपासात याबाबती माहिती मिळाली होती.

याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने तपास करून फेब्रुवारी महिन्यात कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत असून त्यांनी मंगळवारी चव्हाण याला अटक केली. चव्हाण यांच्यासह तोतया अधिकारी प्रसाद देसाई, संजय पाटील, गणेश पाटील, दीपक मोरे, एन. डी. निर्मले. गोविंद सावंत, शशांक लिमये, यशवंत पवार, सह दुय्यम अधिकारी (खरा अथवा तोतया अधिकारी) व कागदपत्रे बनवण्यास प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मदत करणारी व्यक्ती यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. त्यांच्या सहभागाबाबत आर्थिक गुन्हे शाखा चव्हाण यांची चौकशी करणार आहे.

तक्रारीनुसार, शीव येथील व्यावसायिक केदार डेगवेकर यांनी याप्रकरणी तक्रार केली आहे. तक्रारीनुसार, आरोपी पुरुषोत्तम चव्हाण यांनी तक्रारदार आणि इतर लोकांना फसवले, असा आरोप आहे. आरोपीने सरकारी कोट्यातील सदनिका सवलतीच्या दरात विकण्याचे खोटे आश्वासन दिले होते. तक्रारदारांना दाखवण्यात आलेल्या विविध प्रकल्पापैकी प्रभादेवी येथील प्रकल्पातील ३ बीएसके सदनिका त्यांना पसंत पडली. त्याचा बाजारभाव सात ते साडेसात कोटी रुपये होता. पण ती सदनिका साडेतीन कोटी रुपयांमध्ये सरकारी कोट्यातून मिळणार होती. त्यासाठी तक्रारदारांनी चव्हाण यांच्या खात्यावर रक्कम होती. त्यासाठी तक्रारदारांनी चव्हाण यांच्या खात्यावर रक्कम जमा केली.

याप्रकरणी ईडीने चव्हाण यांच्या कुलाबा येथील घरावर शोध मोहीम राबवली. त्यावेळी त्यांना अशा विविध व्यवहारांची कागदपत्रे सापडली. ती आर्थिक गुन्हे शाखेला दिली असता तक्रारदारांसह इतर १९ जणांकडून अशा प्रकार एकूण २४ कोटी ७८ लाख ६६ हजार रुपये घेतल्याचे निष्पन्न झाले. फसवणूक झालेल्या व्यक्तींना बनावट अॅग्रिमेंट फॉर सेल देण्यात आले होते. त्यात इतर आरोपींचे सरकारी अधिकारी म्हणून नाव नोंदवण्यात आले होते. याप्रकरणी चव्हाण आणि इतर आरोपींविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० (फसवणूक), ४१९ (प्रतिरूप देऊन फसवणूक करणे), ४६५ (खोटी कागदपत्रे तयार करणे), ४६७ (मूल्यवान कागदपत्रांची बनावट नोंदणी करणे), ४६८ (फसवणुकीसाठी बनावट कागदपत्रे तयार करणे), ४७१ (बनावट कागदपत्रांना खरी असल्याचे दाखवून वापरणे) आणि १२० (ब) (फौजदारी कट रचणे) या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा अधिक तपास करीत आहे.

आरोपी पुरुषोत्तम चव्हाण वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचे पती आहेत. दरम्यान, महिला पोलीस अधिकाऱ्याने मानसिक क्रूरता, आर्थिक छळ, पतीचे बायपोलर डिसऑर्डर व आर्थिक व्यवहार लपवल्याप्रकरणी गेल्यावर्षी घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने महिला अधिकाऱ्यालाही समन्स बजावून चौकशीला उपस्थित राहण्यास सांगितले होते. त्यानुसार त्यांनी एकदा आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयाला भेट दिली होती.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.