Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कुपवाड येथील तरुणाच्या खूनप्रकरणी गुन्हेगाराला अटकलूटमारीच्या वाटणीच्या वादातून केली होती गेम : अंबेजोगाई येथे सांगली एलसीबीची कारवाई

कुपवाड येथील तरुणाच्या खूनप्रकरणी गुन्हेगाराला अटक
लूटमारीच्या वाटणीच्या वादातून केली होती गेम : अंबेजोगाई येथे सांगली एलसीबीची कारवाई 

सांगली : खरा पंचनामा 

कुपवाड येथे दि. 25 मे रोजी झालेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराच्या खुनप्रकरणी अंबेजोगाई येथून एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली. मृत तरुण आणि संशयितांमध्ये लूटमारीच्या वाटणीवरून झालेल्या वादातून कुपवाड येथील गुन्हेगाराचा खून केल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली. यातील अन्य संशयितांचा शोध सुरु असल्याचेही सांगितले.

रितेश वसंत चव्हाण, (वय 20, रा. वैदुवस्ती, विलासनगर, लातुर, सध्या रा. आंबेजोगाई, जि. बीड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. दि. 25 मे रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास कुपवाड येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार श्रवणेशनाथ चौगुले याचा खून करण्यात आला होता. यातील संशयितांना पकडण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहायक निरीक्षक नितीन सावंत यांचे एक पथक तयार केले होते. पथक हल्लेखोरांचा शोध घेत होते. त्यावेळी पथकातील हवालदार सागर लवटे यांना हा खून अंबेजोगाई येथील सराईत गुन्हेगार रितेश चव्हाण आणि त्याच्या साथीदारांनी केल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली.

पथकाने अंबेजोगाई येथे जाऊन चव्हाण याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यावर कुपवाड येथे केलेल्या लूटमारीच्या वाटणीच्या वादातून साथीदारांच्या मदतीने चौगुले याचा खून केल्याची कबुली दिली तसेच लूटमारीच्या गुन्ह्याचीही कबुली दिली. त्याला कुपवाड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. खुनातील अन्य संशयितांचा शोध सुरु आहे.

एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने सहायक निरीक्षक नितीन सावंत, सागर लवटे, संदिप गुरव, मच्छिंद्र बर्डे, संकेत मगदुम, अतुल गाने, सतिश माने, अनिल कोळेकर, नागेश खरात, अमर नरळे, महादेव नागणे, संदिप नलावडे, अभिजित पाटील, करण परदेशी, कुपवाड एम.आय.डी.सी. पोलीस ठाणेकडील गजानन जाधव, संदिप पाटील, प्रविण गोहिते, संदिप घस्ते, बीड जिल्हयातील राजू पठाण, मनोज घोडके यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.