... अन् संभाजी भिडे एकनाथ शिंदेंना न भेटताच निघून गेले!
जयसिंगपूर : खरा पंचनामा
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट न घेताच परतण्याची वेळ आली. एकनाथ शिंदे कोल्हापूरमधील जयसिंगपूर येथे एका कार्यक्रमात उपस्थित राहणार होते.
संभाजी भिडे त्यांच्या भेटीसाठी पोहोचले असता, पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना रोखलं. संभाजी भिडेंनी 15 ते 20 मिनिटं तिथेच उभं राहून एकनाथ शिंदेंची वाट पाहिली. यानंतर मात्र ते एकनाथ शिंदेंना न भेटताच निघून गेले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वारूढ पुतळ्याच्या उद्घाटनानिमित्त येणार होते. त्यामुळे त्यांची भेट घेण्यासाठी संभाजी भिडे सांगलीहुन कार्यक्रमस्थळी येऊन पोहोचले होते. पण पोलिसांनी त्यांना सुरक्षेच्या कारणास्तव मेटल डिटेक्टरबाहेरच रोखलं. त्यामुळे संभाजी भिडेंनी तिथंच उभे राहून 15 ते 20 मिनिटे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वाट पहिली. नंतर मात्र ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट न घेताच निघून गेले.
कोल्हापूरचे शाहू महाराज छत्रपती यांचा लोकसभा निवडणूकीत पराभव व्हावा यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जंग जंग पछाडलं होतं. लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यादाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि काँग्रेसचे खासदार शाहू महाराज छत्रपती एका व्यासपीठावर दिसले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.