पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सांगली जिल्ह्यातील घरेलू कामगारांच्या मोफत आरोग्य तपासणीबाबत आढावा बैठक
सांगली : खरा पंचनामा
सांगली जिल्ह्यातील घरेलू कामगारांच्या मोफत आरोग्य तपासणीबाबत आढावा बैठक पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे गुरुवारी झाली.
चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, सांगली जिल्ह्यात एकूण 7 हजार 77 घरेलू कामगारांची नोंद असून त्यामध्ये जवळपास 99 टक्के महिला आहेत. त्यांच्यासाठी जिल्ह्यातील शासकीय रुग्णालये, महात्मा फुले जन आरोग्य योजनेशी संलग्नित रूग्णालये व 29 धर्मादाय रुग्णालयांकडून दिनांक 14 मे 2025 रोजी मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. या अभिनव उपक्रमाचा घरेलू कामगारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी पाटील यांनी केले.
यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, सांगली मिरज व कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त सत्यम गांधी, जिल्हा शल्य चिकित्सक विक्रमसिंह कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी विजयकुमार वाघ, कामगार आयुक्त एम. ए. मुजावर, माझे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव आदी उपस्थित होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.