Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पोलीस अधीक्षकांचा एक आदेश अन् पोलीस निरीक्षकाची उचलबांगडी

पोलीस अधीक्षकांचा एक आदेश अन् पोलीस निरीक्षकाची उचलबांगडी

बीड : खरा पंचनामा

बीड पोलीस दलात काही दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांच्या आदेशानंतर ६०० हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या. त्यानंतर बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांनी पुन्हा एकदा आदेश दिला. पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांच्या आदेशाने आता पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांची बदली झाली आहे. उस्मान शेख यांची थेट लातूरला बदली करण्यात आली आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणादरम्यान भाजप आमदार सुरेश धस यांनी पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. पोलीस निरीक्षक उस्मान शेख हे परळी पोलीस स्टेशनला होते. पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांची बदली वाल्मीक कराडच्या सांगण्यावरून झाल्याचा आरोप झाला होता. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि तृप्ती देसाई यांनीही गंभीर आरोप केले होते.

बीड येथील स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांची लातूरला बदली झाली आहे. त्यांच्या जागी स्थानिक गुन्हे शाखेचा पदभार कोणाकडे दिले जातो, हे पाहावे लागणार आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणांमध्ये बीडच्या पोलिसांवरती गंभीर आरोप झाले. त्यामध्ये बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आले होते.

उस्मान शेख यांची नियुक्ती वाल्मीक कराडच्या सांगण्यावरून झाल्याचा आरोप झाला होता. शेख यांच्या नियुक्तीचा आरोप भाजप आमदार सुरेश धस सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि तृप्ती देसाई यांनी केला होता. यानंतर बीडची पोलीस यंत्रणा आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

मात्र बीड पोलीस अधीक्षक नवनीत कावंत बीडमधील कर्मचाऱ्यांच्या बदल्यासह आता ठाणे प्रमुखांच्याही बदल्या करण्याचं ठरवलं आहे. यामध्ये प्रमुख समजली जाणारी शाखा म्हणजे स्थानिक गुन्हे शाखा या स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख उस्मान शेख यांची बदली आता करण्यात आली आहे. त्यांची बदली लातूरला करण्यात आली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.