Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

दुबईतून सोने तस्करी : सांगलीतील सराफाला अटकडीआरआयची कारवाई : याच प्रकरणात सांगलीतील एकाने नागपुरात डीआरआय कार्यालयात केली होती आत्महत्या

दुबईतून सोने तस्करी : सांगलीतील सराफाला अटक
डीआरआयची कारवाई : याच प्रकरणात सांगलीतील एकाने नागपुरात डीआरआय कार्यालयात केली होती आत्महत्या

नागपूर : खरा पंचनामा

दुबईतून सोने तस्करी करणाऱ्या सांगली जिल्ह्यातील दोघांना महसूल गुप्तचर संचलनालयाने (डीआरआय) जून 2024 मध्ये अटक केली होती. या तस्करीत सांगलीतील सराफ व्यावसायिक दीपक मधुकर सगरे याचा आर्थिक सहभाग असल्याबाबत सांगलीतील दोघांसह कोलकोता येथील एकाच्या चौकशीत स्पष्ट झाले होते. त्यानुसार शुक्रवारी मुंबई आणि पुणे येथील डीआरआय पथकाने सगरे याला अटक केली आहे. दरम्यान यातील सांगलीतील एका संशयिताने नागपूर येथील डीआरआयच्या कार्यालयातील 6 व्या मजल्यावरून उडी मारून 17 जून 2024 रोजी आत्महत्या केली होती.

दीपक मधुकर सगरे (रा. टिळक चौक, रघुप्रताप अपार्टमेंट) असे अटक केलेल्या सराफाचे नाव आहे. तर दीपक मच्छिंद्र देसाई (वय 27, रा. सांगली) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. दुबईहून सोने तस्करी केल्याच्या प्रकरणात सांगली जिल्ह्यातील देसाई याच्यासह सुनील जालिंदर घोडके याला १४ जून रोजी हावड्याहून रेल्वेने येताना मध्यरात्री आरपीएफने डीआरआयच्या सूचनेनुसार नागपूर येथे अटक केली होती. त्या दोघांची तपासणी केल्यावर त्यांच्याकडे वितळवलेले कापडाच्या स्वरूपात असणारे सोने सापडले. त्यांच्याकडून ३.४ किलो वजनाचे सव्वातीन कोटींचे सोने जप्त केले आहे. त्यानंतर दोघांचा नागपूर डीआरआयने त्यांचा ताबा घेतला.

नागपूरमधील सीजीओ कॉम्प्लेक्समधील महसूल गुप्तचर संचालनालयाच्या सहाव्या मजल्यावरील कार्यालयात देसाईची चौकशी सुरु होती. त्यावेळी त्याने खिडकीतून उडी मारली. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले जिथे गंभीर दुखापतींमुळे त्याचा मृत्यू झाला. याबाबत गिट्टीखदान पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान डीआरआयने देसाई आणि घोडके यांच्याकडे केलेल्या चौकशीत तसेच त्यांच्याकडील मोबाईलच्या तपासणीनंतर ते कोलकाता येथील राहुल वाघमोडे याच्याशी मोबाईलद्वारे संपर्कात असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर डीआरआयने वाघमोडे याला कोलकाता येथून नोव्हेंबर २०२४ मध्ये अटक केली. त्यावेळी या तिघांशी सर या नावाने एक व्यक्ती संपर्कात असल्याचे तपासात स्पष्ट झाले. त्या व्यक्तीबाबत अधिक तपास केल्यानंतर ती व्यक्ती सांगलीतील सराफ दीपक सगरे असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सगरे याचे काॅल डिटेल्स आणि बॅंकेचे आर्थिक व्यवहार तपासल्यानंतर त्याचा यामधील सहभाग स्पष्ट झाला. त्यानंतर शुक्रवारी मुंबई आणि पुण्यातील डीआरआयच्या पथकाने सांगलीत येऊन त्याला अटक केली. न्यायालयाच्या ट्रान्झिट रिमांडने त्याचा ताबा घेऊन त्याला नागपूरला नेण्यात आले आहे.

सगरे तस्करीच्या टोळीचा सूत्रधार?
दरम्यान डीआरआयने आतापर्यंत केलेल्या चौकशी सगरे हाच कोलकाता येथील वाघमोडे आणि सांगलतील घोडके आणि देसाई यांच्या मोबाईलवरून संपर्कात असल्याचे स्पष्ट झाले आहे. सगरे याच्या सांगण्यावरून हे तिघेही परदेशातून आणलेले सोने पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्रात तस्करी करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सोने तस्करीचा मुख्य सूत्रधार सगरे असल्याचा डीआरआयचा संशय आहे. त्याच्याकडील चौकशीनंतर याचा तपशील मिळू शकेल असे सूत्रांनी सांगितले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.