Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"माझ्या पीएला भांडे घेण्यासाठी सांगलीहून फोन?"

"माझ्या पीएला भांडे घेण्यासाठी सांगलीहून फोन?"

छत्रपती संभाजीनगर : खरा पंचनामा

'माझा पीए छत्रपती संभाजीनगरचा त्याला सांगलीवरून फोन आलाय. तुमचे भांडे आलेत ते भांडे घेऊन जा. सांगली कुठे छत्रपती संभाजीनगर कुठे. कामगारांना संसारोपयोगी साहीत्य वाटपात राज्यभरात घोटाळा झालाय. बोगस याद्या बनवून हा सगळा प्रकार सुरुय. या योजनेची केवळ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची नव्हे तर राज्यभरातील सर्व गैरप्रकाराची एआयटी चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे. असे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले.

शहरात माध्यमांशी संवाद साधताना रविवारी (ता. २५) ते म्हणाले, महाराष्ट्र घरेलू कामगार महामंडळाअंतर्गत शासनाची कामगारांना मदत करण्यासाठी संसारोपयोगी साहित्य देण्याची भूमिका होती. त्यात प्रत्येक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होतोय. याचे प्रमाण अत्यंत मोठ्या प्रमाणावर आहे. लाभार्थी सोडाच इतरांची नावे अॅड करणे.

यात अधिकाऱ्यांसह एजंट आहे. एआयटी चौकशी झाली पाहीजे. छत्रपती संभाजीनगर मध्ये एक एजंटचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. यातील दोषींना जेलमध्ये टाकले पाहीजे. माझ्याकडे तक्रारी आल्या. त्यात चौकशी करायला लावली. कोणत्याही गोडावून मधून हे साहित्य पुरवले जाते. यात एजंट लोकांमार्फत हा मोठा घोटाळा सुरू आहे. यात कोट्यावधींचा भ्रष्टाराचार झालाय. बोगस नावे अॅड करून त्यांच्याकडून दोन ते चार हजार रुपये घेण्याचे काम सर्रास सुरू आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी करणार आहे. असे मंत्री शिरसाट म्हणाले.

छत्रपती संभाजीनगरात जे दरोडे, घरफोडी, चोऱ्या झाल्या. हे जे दरोडे, छोटे मोठे चोर आहेत त्यांना काही पोलीस विभागातील काही लोक सहकार्य करत असल्याच्या तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. त्या दृष्टीने पोलीस आयुक्तांनी तपास करावा. एका दिवसात चोर आले नाहीत. ही एक साखळी आहे. ती शोधून काढण्याच्या सुचना पोलीस आयुक्तांना दिल्या आहेत. असे पालकमंत्री संजय शिरसाट म्हणाले. पंधरा दिवसांपुर्वी शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगरच्या शहर पोलीस दलाचे वाभाडे काढले होते. त्यानंतरही लागोपाट तीन दरोडे पडले. तसेच चोऱ्यांची संख्याही वाढली. त्यामुळे आज शिरसाट यांनी पुन्हा एकदा पोलीसांना निशान्यावर घेतले.

स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवर युती व्हावी यासाठी शिवसेना सकारात्मक आहे. 'आम्ही युती करण्याच्या मनःस्थितीत आहोत. युती व्हावी असा आमचा मनोदय आहे' असे मंत्री शिरसाट म्हणाले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.