Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

बुलढाण्याचे पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या बदलीला 'कॅट'ची स्थगिती

बुलढाण्याचे पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या बदलीला 'कॅट'ची स्थगिती

बुलढाणा : खरा पंचनामा 

बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांची बदली करण्यात आली आहे. केवळ आठ महिन्यातच पानसरे यांची बुलढाणा येथून बदली झाल्याने जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली होती. या बदलीविरोधात पानसरे यांनी 'कॅट'मध्ये धाव घेतली होती. 'कॅट'ने त्यांच्या बदलीला स्थगिती दिली आहे.

विश्व पानसरे यांच्या जागी जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून आता नीलेश तांबे यांची नियुक्ती करण्यात आली होती. गुरुवारी गृह मंत्रालयाने बदल्यांचे आदेश निर्गमित केले आहेत. जेमतेम आठ महिन्यात पोलीस अधीक्षक पानसरे यांची झालेली बदली चर्चेचा विषय ठरली होती. विशेष म्हणजे, त्यांची बदली दुय्यम शाखेत करण्यात आली आहे. त्यांची अमरावती येथील राज्य राखीव दल गट क्रमांक ९ येथे समूपदेशक म्हणून बदली झाली होती. पोलीस विभागच नव्हे राजकीय वर्तुळात देखील या बदलीची चर्चा सुरु होती.

१३ ऑगस्ट २०२४ रोजी विश्व पानसरे यांची बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र अवघ्या ८ महिन्यांच्या कार्यकाळानंतर त्यांची बदली करण्यात आल्याने त्यांनी या बदलीविरोधात 'कॅट'मध्ये धाव घेतली. 'कॅट'ने त्यांच्या बदलीला स्थगिती दिली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.