विट्यात सराईत चोरट्याला अटक
दोन लाखांचा ऐवज जप्त : सांगली एलसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
विटा आणि आटपाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी करणाऱ्याला सराईताला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून दोन गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले असून दोन लाखाचा ऐवज जप्त केल्याची माहिती एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.
लखन संभाजी चव्हाण (वय 35 रा. बादलकोट, करकंब ता. पंढरपूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. चोरीच्या गुन्ह्यातील संशयितांना अटक करण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहाय्यक निरीक्षक सिकंदर वर्धन यांचे पथक तयार केले होते. विटा परिसरात पथक गस्तीवर होते. त्यावेळी पथकाला सराईत चोरटा लखन चव्हाण हा विटा येथील बळवंत कॉलेज नजीक चोरीचा ऐवज विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे पथकाने सापळा लावला होता. त्यावेळी लखन चव्हाण हा हातात एक पिशवी घेऊन उभा असल्याचे पोलिसांना दिसले. पोलिसांनी त्याला पळून जाण्याची कोणतीही संधी न देता ताब्यात घेतले. अधिक चौकशीत त्याने विटा आणि आटपाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोऱ्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून १ लाख ८० हजार रुपयांची सोन्याची रिंग, अंगठी, मणी असे दागिने आणि वीस हजार रुपये किमतीचा चांदीचा कंमरपट्टा जप्त केला आहे.
एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सिकंदर वर्धन, हवालदार सूर्यकांत साळुंखे, संजय पाटील, अतुल माने, हनुमंत लोहार, सोमनाथ गुंडे, प्रमोद साखरपे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.