तुम्हाला सुरक्षा यंत्रणांचं खच्चीकरण करायचं आहे का?
नवी दिल्ली : खरा पंचनामा
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या चौकशीसाठी न्यायालयीन आयोग स्थापन करण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज (दि. १) फेटाळून लावली. तुम्हाला सुरक्षा यंत्रणांचं खच्चीकरण करायचं आहे का? असे खडेबोल सुनावत परिस्थितीची संवेदनशीलता असूनही बेजबाबदार याचिका दाखल केल्याबद्दल न्यायालयाने याचिकाकर्त्यांना फटकारले.
काश्मीरमधील रहिवासी मोहम्मद जुनैद, फतेश कुमार साहू आणि विक्की कुमार यांनी ही याचिका दाखल केली होती. याचिकेत २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याची चौकशी करण्यासाठी न्यायालयीन आयोग स्थापन करण्याची मागणी केली होती. तसेच केंद्र आणि जम्मू-काश्मीर सरकारला काश्मीरमधील इतर पर्यटकांचे संरक्षण करण्यासाठी निर्देश देण्याची विनंती केली होती. सर्वोच्च न्यायालयाने मात्र याचिका दाखल करणाऱ्या वकिलांवर कडक शब्दात टीका केली. न्यायमुर्ती सूर्यकांत आणि एन. कोटीश्वर सिंह यांच्या खंडपीठाने ही याचीका फेटाळली.
"अशी जनहित याचिका दाखल करण्यापूर्वी जबाबदारीने वागा. देशाप्रती तुमचे काही कर्तव्य आहे. या संकटाच्या आणि घडीच्या काळात तुम्ही अशा प्रकारे सैन्याचे मनोबल खचवण्याचा प्रयत्न करत आहात? तुम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांना चौकशी करण्यास सांगत आहात. निवृत्त उच्च न्यायालयाचे किंवा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश कधीपासून तपासात तज्ज्ञ झाले आहेत? आम्ही फक्त वादांवर निर्णय घेतो. आम्हाला आदेश देण्यास सांगू नका", अशा शब्दात न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी याचिकाकर्त्यांना फटकारले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.