फसवणूक करणारे मिरजेचे दाम्पत्य अजूनही मोकाटच
कारवाई न केल्यास अशोक मासाळे यांचा उपोषणाचा इशारा
सांगली : खरा पंचनामा
जागा विकसित करण्यास देतो असे सांगून फसवणूक केल्याप्रकरणी तसेच ‘ॲट्रॉसिटी’ चा गुन्हा दाखल असलेल्या मिरजेतील इब्राहिम मोहंमदसाहेब नाईकवडी (इनामदार) व जस्मीन इब्राहिम नाईकवडी (इनामदार) या दाम्पत्यावर विश्रामबाग व मिरज शहर पोलिसांनी कारवाई केली नाही. त्यामुळे दोघांवर कारवाई करावी या मागणीसाठी उपोषण करण्याचा इशारा फिर्यादी अशोक मासाळे यांनी दिला आहे.
फिर्यादी मासाळे यांनी पोलिस अधीक्षक यांच्याकडे तक्रार अर्ज दिला आहे. त्यात म्हंटले आहे, इब्राहिम नाईकवडी व जस्मीन नाईकवडी यांनी श्री डेव्हलपर्स ॲन्ड कन्सलटंट या फर्मकडे जागा विकसित देण्याबाबत करार केला. त्यासाठी रक्कम घेतली. प्रत्यक्षात कराराची पूर्तता न करता फसवणूक केली. त्यामुळे विश्रामबाग पोलिस ठाण्यात दोघांविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. तसेच नाईकवडी दाम्पत्याने जातीवाचक शिवीगाळ केल्याबद्दल मिरज शहर पोलिस ठाण्यात ‘ॲट्रॉसिटी’ चा गुन्हा दाखल आहे.
नाईकवडी दाम्पत्याने वेगवेगळ्या ठिकाणी काहीजणांची कोट्यवधी रूपयांची फसवणूक केली आहे. २०२२ मध्येही मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात मुंबई उच्च न्यायालयाने जामिन फेटाळूनही संशयित उघड माथ्याने वावरत आहे. विश्रामबाग आणि मिरज शहर पोलिस ठाण्यातील गुन्ह्यात दाम्पत्याला अद्याप अटक केली नाही. उलट गुन्हे मागे घ्यावेत म्हणून त्यांच्याकडून विनयभंग किंवा खोटा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी अन्यथा उपोषण करावे लागेल असा इशारा मासाळे यांनी दिला आहे.
परदेशात पलायनाची तयारी
मिरजेतील नाईकवडी दाम्पत्याच्या नावावर असणारी बँक खाती गोठवण्यात यावी. त्यांना फरार घोषित करून मालमत्ता जप्त करण्याचा आदेश करावा. दोघेजण परदेशात पळून जाण्याच्या तयारी असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे पासपोर्ट रद्द करून त्यांना लूक आऊट ची नोटीस द्यावी अशी मागणी अशोक मासाळे यांनी केली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.