पाककडून 'गोळी' चालवल्यास, आमच्याकडून 'गोळा' चालेल
पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दिल्ली : खरा पंचनामा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलेले नाही, असे म्हटले आहे. 'पाकिस्तानने जर पुन्हा गोळीबार केला तर आम्ही देखील गोळीबार करू आणि जर त्यांनी हल्ला केला तर आम्ही देखील त्यांला चोख प्रत्युत्तर देऊ", असे स्पष्टच सांगितल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. आज (दि.११) झालेल्या तिन्ही दलाच्या बैठकीदरम्यान पीएम मोदींना पाकिस्तानला थेट इशाराच दिला आहे, या संदर्भात ANIने एक्स पोस्ट केली आहे.
'तिथून गोळ्या झाडल्यास, येथून गोळे झाडले जातील', असा इशारा PM मोदींनी पाकिस्तानला दिला आहे की. तसेच ऑपरेशन सिंदूरमधील पाकिस्तानमधील हवाई तळांवरील हल्ले हा महत्त्वाचा टप्पा असल्याचेही पीएम मोदी म्हटल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
कश्मीरबाबत आमची भूमिका खूपच स्पष्ट आहे. आता फक्त एकच मुद्दा उरलेला आहे, तो म्हणजे पाकिस्तानच्या कब्ज्यातील काश्मीर (PoK) परत मिळवणे. याशिवाय इतर कोणत्याही विषयावर पाकबरोबर चर्चा करण्यासारखे काहीही नाही. जर पाकिस्तान दहशतवाद्यांना आपल्याकडे सुपूर्द करण्याबाबत बोलत असतील, तर आपण चर्चा करू शकतो. माझा कोणत्याही दुसऱ्या विषयावर बोलण्याचा अजिबात इरादा नाही. आम्हाला कोणतीही मध्यस्थता नको. आम्हाला कुणाच्याही मध्यस्थीची गरज नाही.
न्यूयॉर्क टाइम्सच्या अहवालानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वान्स यांच्याशी बोलताना स्पष्टपणे सांगितले की, जर पाकिस्तानने काही कारवाई केली, तर भारताकडून त्याला अधिक तीव्र आणि विनाशकारी प्रत्युत्तर दिले जाईल. त्याच रात्री पाकिस्तानने २६ ठिकाणी हल्ले केले आणि भारताने त्याला जोरदार उत्तर दिले. पाकिस्तानच्या ठिकाणांवर भारताने प्रतिहल्ले केले, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.