Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

न्यायाधीश वर्मा यांच्या बंगल्यात सापडलेल्या नोटा गायब? सरन्यायाधीशांकडून पंतप्रधान, राष्ट्रपतींना अहवाल

न्यायाधीश वर्मा यांच्या बंगल्यात सापडलेल्या नोटा गायब? 
सरन्यायाधीशांकडून पंतप्रधान, राष्ट्रपतींना अहवाल

नवी दिल्ली : खरा पंचनामा

दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीशी यशवंत वर्मा यांच्या बंगल्यात कोट्यवधीचं घबाड सापडल्यानंतर न्यायव्यवस्था हादरली आहे. याप्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. त्यांच्या घरात सापडलेल्या रोकडबाबतचे रहस्य आणखीच वाढले आहे. देशाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांना या प्रकरणात चौकशी करीत असलेल्या उच्चस्तरीय समितीने सांगितले की वर्मा यांच्या बंगल्यातून आम्हाला कुठलीही रोकड मिळाली नाही. त्यामुळे ही रक्कम कुठे गायब झाली, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

वर्मा यांच्या घरी 14 मार्च रोजी लागलेल्या आगीत काही नोट्या जळाल्याचे अग्नीशामक दलाच्या जवानांनी सांगितले होते. काही नोटा चांगल्या असल्याचे त्यांनी सांगितले होते. ते घटनेचा व्हिडिओ करुन निघून गेले होते. पण समितीला कुठलीही रक्कम मिळाली नसल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणाचा मास्टरमाइंड कोण, असा प्रश्न आता विचारण्यात येत आहे.

समितीने आपला अहवाल सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्याकडे दिला आहे. या प्रकरणात आढळलेल्या नकदी नोटा आता गायब झाल्या आहेत. त्यांना वर्मा यांच्या बंगल्यात काम करणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांवर संशय आहे. समितीने वर्मा यांचे खासगी कर्मचारी, अग्नीशामक दलाच्या कर्मचाऱ्यांचा जवाब घेतले आहेत.

आगीत जळालेल्या आणि चांगल्या असलेल्या नोटा आम्ही पोत्यांमध्ये भरुन ठेवल्या होत्या, त्यांचा व्हिडिओ काढला आहे. चांगल्या नोटा जप्त न करता, आम्ही निघून गेलो, असा जवाब फायर ब्रिगेडच्या टीमने दिला आहे. पंजाब आणि हरियाणाचे मुख्य न्यायाधीश शील नागू, हिमाचल प्रदेश न्यायाधीश जीएस संधावालिया आणि कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अनु शिवरामन हे या चौकशी समितीचे सदस्य आहेत.

दिल्ली पोलिस आयुक्तांच्या सूचनेनंतर दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीस डीके उपाध्याय यांच्यानेतृत्वाखाली वर्मा यांच्या घराची तपासणी करण्यात आली आहे. वर्मा यांच्या सचिवाने याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. ज्या ठिकाणी आग लागली होती त्या ठिकाणी जळालेल्या नोट्यांचे अवशेष आढळले नाहीत, असे तपासणी करण्यास गेलेल्या टीमने सांगितले आहे.

सरन्यायाधीश खन्ना यांनी वर्मा यांच्या चौकशी अहवाल पाठवून याबाबतचे उत्तर मागितले आहे. आपण न्यायाधीश पदाचा राजीनामा द्यावा, असे खन्ना यांनी त्यांना सुचवले आहे. पण वर्मा यांनी राजीनामा देण्यास नकार दिला आहे. त्यानंतर खन्ना यांनी राष्ट्रपती दौपद्री मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे वर्मा यांचा चौकशी अहवाल पाठवला आहे. आता त्यावर राष्ट्रपती आणि पंतप्रधान काय निर्णय घेतात, हे लवकरच समजेल.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.