Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

गृहमंत्री अमित शाहांची नवी खेळी? भाजपा स्वबळावर?

गृहमंत्री अमित शाहांची नवी खेळी? भाजपा स्वबळावर?

मुंबई : खरा पंचनामा

नुकत्याच आटोपलेल्या तीन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांबरोबर घेतलेल्या बैठकांमधील चर्चेसंदर्भातील माहिती समोर आली आहे. ठाणे व पुणे स्वबळावर लढण्याबाबत भाजपची चाचपणी सुरु केली आहे. अमित शाह यांनीच राज्यातील नेत्यांना महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याबद्दलचे संकेत दिल्याचं वृत्त सुत्रांनी दिलं आहे.

शहांकडून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा आढावा दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यात घेण्यात आला. यानुसारच आता भाजपा स्वबळावर लढण्याची चाचपणी करत असल्याचं वृत्त विश्वसनीय सूत्रांनी दिलं आहे. या चाचपणीनंतर आणि पक्षांतर्गत चर्चेनंतर भाजपाने खरोखरच स्वबळाचा नारा दिल्यास मुंबई - ठाण्यात भाजप विरुद्ध उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना तर पुण्यात भाजप विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवारांची राष्ट्रवादी अशा लढतीची शक्यता व्यक्त केली जात आहे.

तीन दिवस राज्याच्या दौऱ्यावर असलेले भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा आढावा घेतला. यामध्ये पक्षाची ताकद किती आणि कुठे आहे यासंदर्भात चर्चा झाल्याचे समजते. भाजपाची ही चाचपणी सध्या प्राथमिक स्तरावर सुरु असून युतीमधील इतर पक्षही प्लॅन बीअंतर्गत अशी तयारी करत असल्याचीही चर्चा आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.