Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

दोन्ही पवार कधी एकत्र येणार ? ते मला माहिती नाही!

दोन्ही पवार कधी एकत्र येणार ? ते मला माहिती नाही!

मुंबई : खरा पंचनामा

गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे, दरम्यान याबाबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांना दोन्ही पवार कधी एकत्र येणार? असा थेट प्रश्न विचारण्यात आला, याला उत्तर देताना ते मला माहीत नाही असं उत्तर शरद पवार यांनी दिलं आहे.

दरम्यान दोन्ही पवार एकत्र कधी येणार? या प्रश्नला उत्तर देताना शरद पवार यांनी थेट एकत्र येणार किंवा एकत्र येणार नाही? याबाबत कोणतंही वक्तव्य न करता कधी एकत्र येणार ते मला माहिती नाही असं म्हटलं आहे, त्यामुळे आता शरद पवार यांच्या या वक्तव्यानं चर्चेला उधाण आलं आहे. दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी कधी एकत्र येणार यावर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे.

'दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? हा प्रश्न जसा तुम्हला पडला आहे, तसाच अनेकांना पडला आहे. दोन्ही पवार एकत्र येणार ही फक्त चर्चा आहे. वरिष्ठांनी याबाबत काहीही सांगितलेलं नाही. एक गोष्ट तुम्ही समजून घ्या, आजपर्यंत ही फक्त चर्चा आहे, वरिष्ठ पातळीवर पवार साहेब असतील, सुप्रिया सुळे असतील, जयंत पाटील असतील यांनी याबाबतीत आम्हाला कुठेही काहीही सांगितलेलं नाही, जर आम्हाला काही कळालं तर आम्ही नक्कीच मीडियासमोर येऊन बोलू,' असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.