Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

रामराजे नाईक निंबाळकरांच्या घरी पोहोचले पोलिसमंत्री गोरेंच्या बदनामी, खंडणी प्रकरणी चौकशी

रामराजे नाईक निंबाळकरांच्या घरी पोहोचले पोलिस
मंत्री गोरेंच्या बदनामी, खंडणी प्रकरणी चौकशी

सातारा : खरा पंचनामा

महिलेने मंत्री जयकुमार गोरे यांना बदमानीची धमकी देत खंडणीची मागणी केली होती. महिलेला खंडणी घेत असताना पोलिसांनी अटक देखील केली होती. या प्रकरणात चौकशीसाठी माजी विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांना नोटीस बजावण्यात आली होती. त्यामुळे खळबळ उडाली होती. आज (शुक्रवार) थेट वडूज पोलिस रामराजे नाईक निंबाळकर यांच्या घरी चौकशीसाठी दाखल झाले आहेत.

मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामी प्रकरणी एका पत्रकाराला अटक करण्यात आली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रभाकर देशमुख यांची देखील या प्रकरणी चौकशी करण्यात येत आहे. त्यांना देखील चौकशीसाठी नोटीस देण्यात आली होती.

रामराजे नाईक निंबाळकर यांना चौकशीला हजर राहण्यासाठी वडूज पोलिसांनी नोटीस दिली होती. मात्र, या नोटीशीनंतर देखील रामराजे हे पोलिस ठाण्यात हजर राहिले नव्हते. त्यामुळे त्यांच्या निवास्थानी पोलिस दाखल झाले आहेत. 'साम टिव्ही'ने दिलेल्या वृत्तानुसार खंडणी मागणारी महिला आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्यामध्ये फोनवर बोलणे झाल्याचे सांगितले जात आहे. त्यासंदर्भात पोलिस चौकशी करत आहेत.

भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मागली काही दिवसांपूर्वी सोलापूरच्या दौऱ्यावर असताना मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामीमागे रामराजे नाईक निंबाळकरांचा हात असल्याचा आरोप केला होता. ते म्हणाले होते की, ज्या महिलेवर आरोप आहेत तीने रामराजेंशी फोनद्वारे संवाद साधला होता त्याचे ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाली होती. त्यामध्ये ती महिला रामराजेंना तुम्हीच एकमेवा आधार आहात असे म्हणत आहेत. त्यावरून सत्य काय ते कळते, असे देखील रणजितसिंह म्हणाले होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.