'रात्री 12 वाजता लोकांची सेवा करण्याची स्थिती आपल्या बँकेमध्ये आपल्याला दुसऱ्यांदा दिसते'
बारामती : खरा पंचनामा
राज्यभरात सध्या चर्चेत असलेली माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीवरून मोठ्या प्रमाणावर आरोप प्रत्यारोप झाल्याचे दिसून आले. बारामतीतील राजकीय वातावरण तापल्याचं चित्र आहे.
बारामती शहरातील आमराई परिसरातील पीडीसीसी बँक ही रात्री अकरा वाजता देखील उघडी होती असा आरोप करण्यात आला होता. याच बँकेत माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या मतदारांच्या यादी देखील सापडल्या असा दावा सहकार बचाव पॅनलकडून करण्यात आलेला होता. रात्रीच्या अकरा वाजता नेमकी ही बँक का उघडी ठेवण्यात आली असा सवाल सहकार बचाव पॅनलच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. सहकार बचाव पॅनलचे रंजन तावरे यांनी याबाबत संताप व्यक्त केला होता, या घटनेवरती आज माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलं आहे.
लोकसभा निवडणुक झाली त्यावेळी बँक उघडलेली होती. आज या बँकेमध्ये हे दुसऱ्यांदा घडत आहे. बँक कशी उघडी होती. बँकेचे नेतृत्व करणारे लोक आहेत, त्यांच्या काही सूचना असल्याशिवाय तो कर्मचारी ती बँक कशाला उघडेल. एवढी लोकांची सेवा करण्याची स्थिती आपल्या बँकेमध्ये आपल्याला दुसऱ्यांदा दिसते आहे. याचा अर्थ काय समजायचा तो समजा असंही पुढे शरद पवार म्हणाले आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.