Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवडीला आव्हान, 16 जूनपर्यंत लेखी युक्तिवाद सादर कराहायकोर्टाचे याचिकाकर्त्यांना आदेश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवडीला आव्हान, 16 जूनपर्यंत लेखी युक्तिवाद सादर करा
हायकोर्टाचे याचिकाकर्त्यांना आदेश

मुंबई : खरा पंचनामा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवडीला आव्हान देत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर याचिका दाखल करण्यात आली आहे. फडणवीस यांची आमदारकी रद्द करा अशी मागणी करण्यात आली असून, न्यायालयाने याप्रकरणी याचिकाकर्त्यांना 16 जूनपर्यंत लेखी युक्तिवाद सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून फडणवीस निवडून आले असून त्यांच्या या निवडीला काँग्रेस उमेदवार प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी हायकोर्टात आव्हान दिले आहे. या याचिकेवर आज गुरुवारी न्यायमूर्ती प्रवीण पाटील यांच्या दालनात सुनावणी घेण्यात आली. फडणवीस यांच्या वतीने ज्येष्ठ वकील सुनील मनोहर, तर याचिकाकर्ते गुडधे यांच्या वतीने ज्येष्ठ वकील महमूद प्राचा यांनी युक्तिवाद केला. निवडणूक याचिका लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम 81 (1) मधील निकष पूर्ण करत नाही. त्यामुळे याचिका फेटाळून लावावी, अशी मागणी फडणवीस यांच्या वतीने करण्यात आली; तर याचिका कायद्यानुसार दाखल करण्यात आली असून याचिकांवर घेतलेले आक्षेप निराधार असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला. दोन्ही बाजूकडील युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवण्याचे स्पष्ट केले; मात्र याचिकाकर्ते गुडधे यांनी लिखित युक्तिवाद सादर करण्याची परवानगी न्यायमूर्तीकडे मागितल्यावर त्यांना 16 जूनपर्यंत लेखी युक्तिवाद सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.