Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कुपवाडमध्ये तरुणाचा धारदार शस्त्राने सपासप वार करून निर्घृण खून कारण अस्पष्ट, अज्ञात हल्लेखोर पसार

कुपवाडमध्ये तरुणाचा धारदार शस्त्राने सपासप वार करून निर्घृण खून 
कारण अस्पष्ट, अज्ञात हल्लेखोर पसार
 

सांगली : खरा पंचनामा

कुपवाड शहरातील बजरंगनगर येथे तरुणाचा धारदार हत्याराने सपासप वार करत खून निर्घृण खून करण्यात आला. शुक्रवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच कुपवाड पोलिसांसह एलसीबीच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान खुनाचे कारण अस्पष्ट असून अज्ञात हल्लेखोर पसार झाले आहेत. पोलीस खुनाच्या कारणाचा तसेच हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

उमेश मच्छिंद्र पाटील (वय २०, रा. कुपवाड) असे मृताचे नाव आहे. कुपवाड औद्योगिक पोलिस घटनास्थळी पोहोचले असून, पंचनामा सुरू होता. रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली नव्हती. सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली. 

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कुपवाड परिसरातील बजरंगनगर येथे उमेश पाटील याचा खून झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. कुपवाड औद्योगिक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पाटील याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आला. दरम्यान, ही माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरली. हा खून कोणत्या कारणातून झाला हे स्पष्ट झालेले नाही.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.