मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात घुसून आत्मदहनाचा प्रयत्न
जळगाव : खरा पंचनामा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगाव दौऱ्यावर आहेत. मात्र, त्यांच्या या दौऱ्यावेळी एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला घुसून एका व्यक्तीने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. पोलिसांनी तत्परता दाखवल्याने मोठा अनर्थ टाळला. पोलिसांनी या व्यक्तीला आता ताब्यात घेतलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 'देवेंद्र फडणवीस यांचा ताफा जळगाव शहरामध्ये दाखल होताच एक व्यक्ती त्यांच्या ताफ्यात घुसला व अंगावर रॉकेल टाकून स्वतःला पेटवण्याचा प्रयत्न केला. ही घटना जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात घडली. त्यानंतर परिसरात खळबळ उडाली. फडणवीस यांच्या ताफ्यात घुसलेल्या या व्यक्तीचे नाव संजय वराडे असं आहे.
शासनाकडे बाकी असलेले पैसे मिळत नसल्याने संजय वराडे यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या जळगाव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.