अंजली दमानियांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचं समन्स
मुंबई : खरा पंचनामा
माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केलेले भ्रष्टाचाराचे आरोप पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी त्या वेळी, "मी सर्व आरोप पुराव्यानिशी सिद्ध करणार," असं ठामपणे सांगितलं होतं.
त्यानंतर आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं (ACB) अंजली दमानियांना चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स पाठवलं आहे. धनंजय मुंडे यांच्या विरोधात अंजली दमानिया यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने ही चौकशी होणार आहे.
दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात एकीकडे गंभीर आरोपांची मालिका सुरू असतानाच, दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्याचे माजी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे खळबळ उडाली होती. दमानिया यांनी मुंडे यांच्यावर कृषिमंत्री असताना सुमारे २४५ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी अंजली दमानियांना हे समन्स पाठवण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

अंजली दमानिया यांनी माजी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळातील कथित भ्रष्टाचारासंदर्भात राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) तक्रार नोंदवली होती. या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर ACB ने दमानिया यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स पाठवले आहे. "दमानिया या चौकशीसाठी उपस्थित राहिल्या नाहीत, तर "त्यांचा या प्रकरणात काहीही आक्षेप नाही" असे गृहीत धरून तक्रारीचा अर्ज दप्तरी दाखल केला जाईल." असेही या पत्रात नमुद करण्यात आले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.