Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"चंद्रहार पाटील यांचा प्रवेश थांबवून दाखवा"

"चंद्रहार पाटील यांचा प्रवेश थांबवून दाखवा"

पुणे : खरा पंचनामा

ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबई, कोकण पाठोपाठ आता पश्चिम महाराष्ट्रात मोठा धक्का बसण्याची चिन्हे आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेतून सांगली लोकसभा निवडणूक लढलेले चंद्रहार पाटील हे 'जय महाराष्ट्र' करण्याच्या तयारीत आहेत.

सोमवारी चंद्रहार पाटील हे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, अशी माहिती मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे. तसेच, हा प्रवेश थांबवून दाखवा, असे आव्हान मंत्री शिरसाट यांनी दिले आहे.

सांगली लोकसभा निवडणूक ठाकरेंच्या शिवसेनेने अचानक चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा केली. यामुळे काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या विशाल पाटील यांची कोंडी झाली. विशाल पाटील, विश्वजित कदम आणि काँग्रेसच्या नेत्यांनी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे चंद्रहार पाटील यांची उमेदवारी मागे घेण्यासाठी विनंती करण्यात आली. पण, खासदार संजय राऊत हे चंद्रहार पाटील यांच्यासाठी आग्रही राहिले आणि विशाल पाटील यांनी महाविकास आघाडीत बंड केले. विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. यानंतर सांगलीत तिरंगी लढत झालेली पाहायला मिळाली.

विशाल पाटील, चंद्रहार पाटील आणि भाजपचे माजी खासदार संजय पाटील, अशी लढत झाली. यात विशाल पाटील यांचा विजय झाला. एव्हढेच नाहीतर चंद्रहार पाटील यांचे डिपॉझिटही जप्त झाले. चंद्रहार पाटील यांना 60,860 मते मिळाली. पण, ज्या चंद्रहार पाटील यांच्यासाठी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी काँग्रेससोबत वितुष्ट घेतले त्यांनीच पक्षाला राम राम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. चंद्रहार पाटील हे सोमवारी अर्थात ९ जूनला शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. हिंमत असेल तर थांबवून दाखवा, असे आव्हान मंत्री संजय शिरसाट यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला दिले आहे.

डबल महाराष्ट्र केसरी असलेले चंद्रहार पाटील यांनी 26 एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कुडाळ येथे भेट घेतली होती. मंत्री उदय सामंत यांच्या मध्यस्तीने ही भेट झाल्याची चर्चा होती. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेत पाठीमागे उभे असलेल्या चंद्रहार पाटील यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर ते ठाकरेंच्या शिवसेनेला सोडतील हे याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यांनी काही दिवसांपूर्वी उदय सामंत यांची देखील भेट घेतली होती. भेटीनंतर त्यांनी मी पक्षासोबत आहेत, काही कामानिमित्त मी त्यांना भेटलो असल्याचं देखील चंद्रहार पाटील यांनी सांगितलं होतं.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.