इराणच्या मित्र राष्ट्राचा इस्रायलवर मोठा हल्ला; युद्ध पुन्हा भडकणार?
दिल्ली : खरा पंचनामा
इराण आणि इस्रायलमध्ये भीषण युद्ध झालं, या युद्धामध्ये दोन्ही देशांचं प्रचंड नुकसान झालं आहे. अखेर दोन्ही देशांकडून युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र आता मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे इराणच्या मित्र राष्ट्राकडून इस्रायलवर बॅलेस्टिक मिसाईल हल्ला करण्यात आला आहे.
येमेनकडून इस्रायलवर मिसाईल हल्ला करण्यात आला आहे. येमेनच्या सशस्त्र दलाचे प्रवक्ता बिग्रेडियर जनरल याह्या यांनी असा दावा केला आहे की आम्ही इस्रायलच्या ताब्यात असलेल्या बीर शेवामध्ये यशस्वी मिसाईल हल्ला केला आहे.
याह्या यांनी केलेल्या दाव्यानुसार येमेनने इस्रायलवर जोलफागर बॅलेस्टिक मिसाईल डागली, हा हल्ला पूर्णपणे यशस्वी ठरल्याचं याह्या यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, गेल्या आठवड्यात देखील येमनने इस्रायलवर बॅलेस्टिक मिसाईल आणि ड्रोनने हल्ला केला होता. आमचे सर्व हल्ले यशस्वी ठरले आहेत. येमेनने नेहमीच पॅलेस्टिनी लोकांप्रती आपली धार्मिक, नौतिक आणि मानवतावादी कर्तव्य पार पाडण्याची वचनबद्धता अधोरेखील केली आहे, त्यामुळे येमेन गाझाच्या लोकांना पाठिंबा देण्यापासून कधीही मागे हटणार नाही, भलेही आम्हाला त्यासाठी कितीही किंमत मोजावी लागली तरी आमची तयारी असल्याचंही यावेळी याह्या यांनी म्हटलं आहे.
इराण, इस्रायल युद्ध सुरू असताना अमेरिकेकडून इराणच्या अणू केंद्रांवर हल्ला करण्यात आला होता, त्यानंतर येमेनने थेट इस्रायला धमकी दिली होती. आमचा इराणला पाठिंबा आहे. आम्ही आमच्या पाठिंब्यापासून कधीही मागे हटणार नाही, अमेरिका आणि इस्रायलने इराणपासून दूर राहावं असं येमेनने युद्ध सुरू असातना म्हटलं होतं. दरम्यान येमेनने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर आता पुन्हा एकदा या क्षेत्रात तणाव वाढण्याची शक्यता आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.