लाच घेताना हेड कॉन्स्टेबलला रंगेहाथ पकडलं; कारवाईवेळी हार्ट अटॅक
दिल्ली : खरा पंचनामा
एका पोलीस हवालदाराला २५ हजाराची लाच घेताना अटक करण्यात आली. या कारवाई वेळी आरोपी हवालदाराला हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर हवालदाराला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
आरोपी पोलीस हवालदाराने मोबाईल टॉवर न हटवण्यासाठी तक्रारदाराकडून ७५ हजारांची लाच मागितली होती. दिल्लीत ही घटना घडली आहे.
दिल्लीतील पश्चिम कमल विहारमध्ये राहणाऱ्या व्यक्तीनं घराच्या छतावर मोबाईल टॉवर लावला होता. यावरून शेजाऱ्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. पीडित व्यक्तीने आरोप केला की, एका हेड कॉन्स्टेबलनं या प्रकरणी ७५ हजारांची लाच मागितली. सुरेंद्र असं हेड कॉन्स्टेबलचं नाव आहे.
कॉन्स्टेबल सुरेंद्रनं पीडित व्यक्तीकडे ७५ हजार मागितले. पीडित व्यक्तीनं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडं तक्रार केली. यानंतर पीडित व्यक्ती हेड कॉन्स्टेबलला हफ्त्यांमध्ये पैसे देण्यास तयार झाली.
आरोपी हेड कॉन्स्टेबलला पैसे देण्यासाठी पीडित व्यक्ती गेले असताना तिथं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी होते. सुरेंद्रला संशय आल्यानंतर त्यानं लाचेचे पैसे त्याच्या सहकाऱ्याकडे दिले. जेव्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुरेंद्रला ताब्यात घेतलं तेव्हा त्याच्याकडे पैसे सापडले नाहीत.
पण सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्यानं लाच घेतल्याचं आढळलं. या कारवाई वेळीच अचानक सुरेंद्रला हृदयविकाराचा झटका आला. यामुळे सुरेंद्रला तातडीनं रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.