नेमून दिलं तिथे गेलेच नाही, दुसऱ्या चौकात जाऊन वसुली; ३ वाहतूक पोलीस सस्पेंड
पुणे : खरा पंचनामा
ज्या चौकात ड्युटी लावली त्या चौकात न जाता दुसऱ्या चौकात केवळ दंड वसुलीवर भर दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या गंभीर बाबीची दखल घेत पुणे वाहतूक विभागाने तातडीने कारवाई करत तीन पोलिसांवर निलंबनाची कारवाई केली आहे.
वाहतूक कोंडी न सोडवता वाहनावर दंड आकारत असल्याचं आढळून आल्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. या घटनेनंतर पुण्यात खळबळ उडाली आहे.
संतोष चंद्रकांत यादव, बालाजी विठ्ठल पवार आणि महिला पोलीस शिपाई मोनिका प्रवीण करंजकर असे वाहतूक विभागातील निलंबित पोलिसांची नावे आहेत. संतोष चंद्रकांत यादव यांची ड्युटी एस पी चौक या ठिकाणी होती. तर, बालाजी विठ्ठल पवार यांची हिराबाग चौक, तर मोनिका करंजकर यांची ड्युटी भावे चौकात होती.
मात्र, त्यांनी आपापली नेमणुकीची ठिकाणं सोडून पुरम चौकातील गाड्यांना अडवून दंड आकारत असल्याची माहिती समोर आली. याची माहिती समोर आल्यानंतर वाहतूक विभागाने तातडीने कारवाई करत तीन पोलिसांना निलंबित केलं.
दररोज शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी जाणवते. अशा परिस्थितीत वाहतूक नियमनाऐवजी दंड आकारण्यावर भर देणं गंभीर बाब मानली जात आहे. त्यामुळेच वाहतूक विभागाने तात्काळ कारवाई करत या तिघांना निलंबित केलं आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.