Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मुंबई हल्ल्यांतील शहीद पोलिसाला मरणोत्तर पदोन्नती

मुंबई हल्ल्यांतील शहीद पोलिसाला मरणोत्तर पदोन्नती

मुंबई : खरा पंचनामा

२६/११ दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस शिपाई अरुण रघुनाथ चित्ते यांना मरणोत्तर सहाय्यक उपनिरीक्षक (चालक) पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. यावेळी त्यांच्या कुटुंबियांना आमंत्रित करून त्यांना सन्मानीत करण्यात आले.

यावेळी पदोन्नतीची अधिकृत आदेशपत्रे सुपूर्द करण्यात आली. दरम्यान, अतिशय अभिमानाचा आणि भावनांनी भरलेला दिवस असल्याची प्रतिक्रिया मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी व्यक्त केली.

चित्ते यांना १ जून २०२५ पासून पदोन्नती देण्यात आली आहे. आज चित्ते यांच्या कुटुंबियांना आमंत्रित करून त्यांचे अभिनंदन करण्याचा आणि ही पदोन्नतीची अधिकृत आदेशपत्रे सुपूर्द करण्याचा आम्हाला सन्मान लाभला. ही त्यांच्या प्रती कृतज्ञता आणि त्यागाची एक लहानशी, पण मनःपूर्वक केलेली पावती असल्याची प्रतिक्रिया पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी समाज माध्यमांवर व्यक्त केली.

२६ नोव्हेंबर २००८ मुंबई हल्ल्याच्या दिवशी मुंबई पोलीस दलात कार्यरत चालक अरूण रघुनाथ चित्ते यांना वीरमरण आले. ते चकमकफेम विजय साळसकर यांच्या शासकीय वाहनावर चालक म्हणून कार्यरत होते. १९९८ पासून ते साळसकर यांच्यासोबत कार्यरत होते. दरम्यान, कामाची वेळ संपली आहे. पण मुंबईत काही गडबड झाली आहे. त्यामुळे साहेबांसोबत जात असल्याचे चित्ते यांनी हल्ल्यांच्या दिवशी कुटुंबियांना दूरध्वनी करून सांगितले होते. चित्ते नेहमीप्रमाणे आपले कर्तव्य संपवून घरी जात होते. पण मुंबईत दहशतवादी हल्ला झाल्यामुळे त्यांना तेथे जावे लागले. त्याच रात्री दहशतवाद्यांच्या हल्ल्यात साळसकरांबरोबरच चित्ते यांनाही वीरमरण आले. त्यांना कीर्तिचक्र पदक देऊन सन्मानीत करण्यात आले होते.

मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी पदोन्नती मिळालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा उचीत सन्मान करण्याचे आदेश सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक व कक्ष प्रभारींना दिले आहेत. त्यानुसार पदोन्नती मिळालेल्या कर्माचाऱ्यांना पोलीस ठाण्यात सन्मानीत केले जाते. यावेळी वरिष्ठ अधिकारीही उपस्थित राहतात.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.