डान्सबार मध्ये गुन्हे शाखेचा छापा ; पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलंबित
मुंबई : खरा पंचनामा
अंधेरी पूर्वेतील मरोळ येथील नाईट लव्हर्स रेस्टॉरंट अँड बारमध्ये गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईनंतर कर्तव्यात कसूर केल्याबद्दल एमआयडीसी पोलिसांचे वरिष्ठ निरीक्षक राजीव चव्हाण यांच्यावर निलंबिनाची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे मुंबईतील पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचे धाबे दणाणले आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई गुन्हे शाखा आणि मालमत्ता विभागाच्या अधिकाऱ्यांसह पोलिस उपायुक्त राज तिलक रोशन यांनी रात्रीच्या गस्तीदरम्यान अंधेरी पूर्वेतील मरोळ येथील नाईट लव्हर्स रेस्टॉरंट अँड बारमध्ये छापा टाकला. या बार मध्ये ५० हून अधिक बारबाला अश्लील नृत्य करतांना आणि विद्यमान परवाना नियमांचे उल्लंघन करतांना आढळून आले. गुन्हे शाखेच्या कारवाईनंतर स्थानिक एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीरपणे रात्री उशिरापर्यंत बार सुरू चालत असल्याचे दिसून येते. या छाप्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव चव्हाण यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्यात आल्याचे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. चौकशीत असे निष्कर्ष काढण्यात आले की त्यांनी कर्तव्यात कसूर केल्यामुळे बार बेकायदेशीरपणे सुरू राहिला, ज्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले. एमआयडीसी पोलिस ठाण्यात तैनात असलेले वरिष्ठ निरीक्षक चव्हाण यांची नोव्हेंबर २०२४ मध्ये महाराष्ट्र निवडणुकीपूर्वी बदली करण्यात आली आणि मे महिन्यात त्यांना एमआयडीसी पोलिस ठाण्यात पुन्हा नियुक्त करण्यात आले.
या कारवाईमुळे मुंबईतील पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचे धाबे दणाणले असून प्रत्येक वरिष्ठ निरीक्षक स्वतः आपल्या हद्दीत असलेल्या बार आस्थापनाची तपासणी करीत आहे, तसेच रात्रीपाळीला असणाऱ्या पोलिस निरीक्षक यांना हद्दीतील बेकायदेशीर धंदे बंद करण्याचे तसेच बियर बार वेळेत बंद करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.