सांगलीत महिलेचा पतिकडून निर्घृण खून
चरित्र्याचा संशय : दाम्पत्य सोलापूर जिल्ह्यातील, पतीचा शोध सुरु
सांगली : खरा पंचनामा
शहरातील विजयनगर येथील शाहूनगर येथे पतीने पत्नीचा निर्घृण खून केल्याचे गुरुवारी उघडकीस आले. चरित्र्याच्या संशयावरून हा खून झाला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. हे दाम्पत्य सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील आहे. याप्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताच्या शोधासाठी सोलापूर जिल्ह्यात पथके पाठवण्यात आली आहेत.
शिलवंती पिंटू पाटील (वय ४०, मुळ रा. हुलजंती ता. मंगळवेढा जि. सोलापुर, सध्या रा. शाहूनगर, विजयनगर, सांगली) असे मृत महिलेचे नाव आहे. तर पिंटू तुकाराम पाटील (वय 36, मूळ रा. हुलजंती, ता. मंगळवेढा, सध्या रा. शाहूनगर, विजयनगर, सांगली) असे संशयित पतीचे नाव आहे. पाटील दाम्पत्य गेल्या काही महिन्यांपासून सांगलीतील शाहूनगर येथे रहात होते. हे दाम्पत्य मजुरीसाठी सांगलीत आले होते. त्यांना 9 आणि 7 वर्षांची दोन मुले आहेत. या दोघांमध्ये किरकोळ करणावरून तसेच पिंटू शिलवंतीवर चरित्र्याचा संशय घेत असल्यामुळे भांडण होत होती.
मंगळवारी रात्रीही त्यांच्यात भांडण झाले होते. शिलवंती झोपल्यानंतर पिंटूने लाकडी दांडक्याने तिच्या डोक्यात जबर मारहाण केली. ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्यावर तो मुलांना घेऊन तेथून निघून गेला. बुधवारी घटनेची माहिती मिळताच संजयनगरचे पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांच्यासह एलसीबीच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
हा खून पिंटूने केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांची पथके त्याच्या शोधासाठी सोलापूर जिल्ह्यात पाठवण्यात आली आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.